शहर वाॅर्डात जिल्हा परिषद प्रशासनाचे मोठे विस्तीर्ण तलाव आहेत. या तलावातील पाण्याच्या उपयोग सिंचनाकरिता करण्यात येतो. ब्रिटिशांनी तशी व्यवस्था केली होती; परंतु सध्या या तलावाची दुरवस्था झाली आहे. येथील पाणी काळेकुट्ट झाले आहे. तलाव परिसरात नागरिकांची घरे आहेत. सांडपाणी या तलावात जात असल्याची माहिती आहे. सध्या तलावाचे पाणी सिंचनाकरिता कमी प्रमाणात वापरण्यात येेते. त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा राहतो. तलावाचे पाणी शुद्ध राहावे याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. सदर तलावात मासेमारीही करतात. तलावाचे पाणी शुद्ध राहावे याकरिता येथे उपाययोजना करण्याची गरज आहे. शहराच्या मध्यभागी असलेला तलाव देखणा असून, त्याचे सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. सिंचनाकरिता वापर कसा होईल याचे नियोजन करण्याची गरज आहे; परंतु या गावाकडे मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. असेच दुर्लक्ष राहिले तर तलाव केवळ नावालाच राहतील. वर्षभरापूर्वी येथील शेकडो माशांचा मृत्यू झाला होता. असे असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही.
जिल्हा परिषदेच्या तलावातील पाणी काळेकुट्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:37 AM