राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या कमकासूरचे रामपुर नजीक पुनर्वसन करण्यात आले. मात्र तिथे कोणतीही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्रामस्थांनी पुनर्वसन गाव सोडून स्वगावी परतले. संतप्त ग्रामस्थांनी बावनथडी प्रकल्पात सामूहिक जलसमाधीचा इशारा देतच प्रशासन खळबळून जागे झाले. जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनिषा दांडगे व तुमसर येथील उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी आज गावाला भेट दिली.सन २००६ मध्ये जमिन अधिग्रहन करून अवार्ड करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सन २०१२ मध्ये आदिवासी यांचे कमकासुर गावात स्थलांतर झाले. मात्र सन २००६ प्रमाणेच अल्प मोबदला आदिवासी बांधवांना मिळाला. तर बावनथडी प्रकल्पाच्या नहरात गेलेल्या जमिनीचा मोबदला हा चार ते पाच पट देवून आदिवासींना शासनाने सापत्न वागणूक दिली. इतकेच नव्हे तर कमकासुर गावाला १५ कि़मी. अंतरावरील गट ग्रा.पं.ला जोडून मतदानापासून वंचित ठेवले. स्वस्त धान्य दुकानाबाबतही तिच स्थिती आहे. कमकासुर गावाला भेट देवून मागण्या मंजूर केल्या नाही. मात्र लेखी आश्वासनाशिवाय आता माघार घेणार नाही, अशी तटस्थ भूमिका कमकासुर येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.आदिवासींच्या मुळ गावापेक्षा पुनर्वसन गावात सुविधा आहेत. त्यांची मुळ मागणी रोजगार व गेलेली जमिन परत मिळण्याची आहे. या संबंधाने शासनस्तरावर कारवाई होणार. त्यामुळे तुर्तास त्यांना लेखी देण्यात आले नाही.-शिल्पा सोनाले, उपविभाीय अधिकारी, तुमसर.अधिकाºयांनी गावात भेट देवून आदिवासी यांना तुरूंगात पाठविण्याचा धसका दाखविला आहे. आम्ही सर्व तुरूंगात सहखुशीने जावू. मात्र आम्ही घेतलेल्या भूमिकेपासून माघार घेणार नाही.-किशोर उईके, सरपंच कमकासूर.
जलसमाधीची प्रशासनाकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:40 PM
बावनथडी प्रकल्पामुळे बेघर झालेल्या कमकासूरचे रामपुर नजीक पुनर्वसन करण्यात आले. मात्र तिथे कोणतीही सुविधा मिळाल्या नसल्याने ग्रामस्थांनी पुनर्वसन गाव सोडून स्वगावी परतले.
ठळक मुद्देअधिकाºयांची कमकासुरला भेट : आदिवासी आपल्या भूमिकेवर ठाम