डावा कालवा कोणत्या कामाचा-
पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा डाव्या कालव्यातील पाणी अशा वेळी सोडले जात नाही. या कालव्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या कालव्यातील खरीप पिकास तीन महिने पाणी सोडले की पुन्हा पाणी मिळत नाही. आता खऱ्या अर्थाने पऱ्हे जगवण्यासाठी या कालव्याच्या पाण्याची गरज आहे. पऱ्हे सुकल्यावर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. उशिरा पेरणी झाली तर रोवणी सुद्धा उशिरा होणार. पूरपरिस्थती निर्माण झाल्यास पऱ्हे पुन्हा पाण्याखाली जात सडणार आहेत. अशावेळी डाव्या कालव्यातील पाणी सोडणे गरजेचे आहे. डाव्या कालव्याचे अभियंता धोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधलानंतर त्यांनी आतापर्यंत एकाही पाणी वाटप संस्थेने आमच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली नसल्याचे सांगितले.