मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे. हा प्रकार तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात सुरू आहे. आहार पुरवठा कंत्राटदार व शासनात करारनामा झाला नाही. त्यामुळे पुरवठादाराने धान्यादी साहित्य पुरवठा केला नाही. जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी तसा ठराव घेऊन पुरवठा कंत्राटदारास तसे निदेश दिले. परंतु पुरवठा कंत्राटदाराने पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याची माहिती आहे.पुरवठा कंत्राटदार व शासनाचा करारनामा १४ जूनपर्यंत मुदत होती. शालेय पोषण आहारात तांदुळ व धान्यादी मालांचा समावेश आहे. १ आॅगस्ट रोजी कार्यशाळा घेऊन शाळेतील मुख्याध्यापकांना तशी माहिती देण्यात आली होती. पुरवठा कंत्राटदार शाळांना तांदूळ व धान्यादी साहित्यांचा पुरवठा करतात. धान्यादी मालात वाटाणा, मटकी यांचा समावेश होतो. आॅगस्ट व सप्टेंबर मध्ये तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता.दिवाळीपूर्वी शाळात तांदुळ शिल्लक होते. सध्या अनेक शाळेत तांदळाचा व धान्यादी साहित्याचा साठा संपल्याची माहिती आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पोषण आहाराकरिता स्वत:जवळील रुपये खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. काही शाळेत पोषण आहार देणे सुरु आहे तर अनेक शाळांत सध्या शालेय पोषण आहार बंद असल्याची माहिती आहे.१३ जुलै २०१७ ला शाळांनी धान्यादी साहित्य खरेदी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. यात ग्रामीण शाळांचा समावेश आहे. शहरी शाळेत शाळांना निधी देण्यात येतो. १ आॅगस्टपासून तशा सूचना पोषण आहार विभागाने शाळांना दिल्या होत्या.शालेय पोषण पुरवठा कंत्राटदाराला मागील सहा महिन्यापासून बिल मिळाले नाही तथा नवीन करारनामा शासनाने केला नाही. शाळा सुरु होऊन एक आठवडा लोटला आहे.मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असल्या तरी पोषण आहार सध्या शिजत नसल्याची माहिती आहे. बुधवारी भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय पोषण आहार पुरवठादाराला एक ठराव घेऊन शाळांना तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले, परंतु पुरवठादाराने त्यास नकार दिल्याची माहिती आहे. शासन जोपर्यंत करारनामा करणार नाही तोपर्यंत साहित्याचा पुरवठा कसा करायचा असा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते.शिक्षण हक्क कायद्यात शालेय पोषण आहार हा नियमित वाटप करण्याचा दंडक आहे. तो न दिल्यास कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाचा अभावानेच येथे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराला फटका बसत आहे.ज्या शाळेत तांदळाचा साठा संपला आहे. त्या शाळांना वाटाणा, उसळ, पोषण आहार वाटप करणे अनिवार्य आहे. साहित्य संपले असेल तर शाळांनी तशी तरतूद करावी, त्यांना शासन पैसे देणार आहे. यापूर्वी कार्यशाळा घेऊन मुख्याध्यापकांना तशा सूचना दिलेल्या होत्या. करारनाम्याचा विषय शासनस्तरावरचा आहे.-जयप्रकाश जिभकाटे, अधीक्षक, शालेय पोषण आहार विभाग, तुमसर.
पोषण आहार बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 9:41 PM
शालेय पोषण आहाराचा धान्यादी पुरवठा शाळांना न झाल्याने काही शाळात विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देधान्याचा साठा संपला : पुरवठा कंत्राटदाराची करारनाम्याची मुदत संपली