तुमसर : युनिव्हर्सल कारखान्या संदर्भात नेत्रावाला गु्रपचे मुख्य संचालक रामकुमार व त्यांचे सहकारी आसीफ मुल्ला, यु.एस. कुरूप यांच्याशी शिवसनेच्या शिष्टमंडळाने विविध विषयांवर चर्चा केली. प्रत्यक्षात शिवसेनेने उभारलेल्या आंदोलनापुर्वी नेत्रावाला ग्रुप प्लॉट सुरू करण्याच्या मानसिकतेत नव्हता, पण शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनामुळे व शिवसेना पक्षश्रेष्ठीमुळे या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कंपनी सुरू करण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणीवर तोडगा काढण्यावर भर देण्यात आले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, नरेश उचिगगले, प्रा. कमलाकर, निखाडे, कौतुका देशभ्रतार सरपंच माडगी, फुकटू हिंगे उपसरपंच माडगी, कारूजी वहिले, सेलोकर, हरिहर मलिक, गोवर्धन टांक तसेच तुमसरचे पोलीस निरीक्षक गायकवाड, भोंगाडे उपस्थित होते. लवकरच नेत्रावाल्याचा ग्रुप कारखान्याची पाहणी करण्यास येणार आहे. त्यामुळे कारखाना सुरू होण्याचे चिन्ह आहे. (शहर प्रतिनिधी)
तुमसरातील युनिव्हर्सल कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर
By admin | Published: June 16, 2016 1:00 AM