पिंपळगाव येथील भारतीय जनता पक्ष समर्थित काही गावांतील स्थानिक नेत्यांनी आमच्याकडील ग्रामपंचायत सदस्य पळविला. त्या सदस्य महिलेचा सरपंचपदासाठी नामांकन फाॅर्म भरायचा प्रयत्न केला. आमच्याशी दगाफटका केला हे आम्हास लगेच ठावुक झाले. त्या महिला सदस्याला आपल्याकडे आणण्यात यश मिळविले. निवडणुकीत आमचा सरपंच व उपसरपंच झाला. त्यानंतर आम्ही या दगाबाज लोकांच्या सोबत राहणार नाही, अशी शपथ घेतली. सायंकाळी आम्ही फोन करून आमदार राजू कारेमोरे यांना पिंपळगाव येथे बोलावले. आम्ही स्वतः राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, असे सरपंच रेखा गभणे, उपसरपंच उमेश उपरकर यांनी मोहाडी येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पाच वर्षे काय पुढेही आम्ही राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्ता म्हणून कार्य करणार आहोत, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, बीरज गभणे, भाऊराव गडरिये चांभरू जिभकाटे उपस्थित होते.
आम्ही कुठेच जाणार नाही, आम्ही राष्ट्रवादी पक्षातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:24 AM