पत्रपरिषद : कार्यक्रमाचा समारोप २० तारखेला होणार साकोली : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई येथे 'हम में है राजीव' या कार्यक्रमाची घोषणा भारतीय युवक काँग्रेसने २० मे रोजी राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त दिल्ली येथे घोषीत केले होते. त्यांचे देशासाठी काय योगदान होते याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचे स्मरण करून उजाळा देताना आरएसएस व भाजपकडून जाणूनबुजून राजीव गांधी यांचे विचार संपविण्याचा प्रयत्न आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार, अशी माहिती युवक काँग्रेसचे विजय दुबे यांनी दिली. विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रकाश करंजेकर, विधानसभा अध्यक्ष विष्णू रणदिवे, उपाध्यक्ष उमेश भुरे, महासचिव ओम गायकवाड, दिनेश खोटेले उपस्थित होते. ते म्हणाले, डिजीटल इंडिया या नावाने स्वत: प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न होत आहे. पण डिजीटलचे जनक कोण आहेत देशामध्ये संगणक तंत्रज्ञान कोणी आणले हे आरएसएस व भाजप देशाला का सांगत नाही, म्हणून भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली २० रोजी काँगे्रस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. हम में है राजीव कार्यक्रम देशभरात महिनाभर साजरा करण्यात आला. त्याचा समारोप समारंभ मुंबई येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबई येथे झाला. जयंती निमित्त कार्यक्रम महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
'हम में है राजीव'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 19, 2016 12:37 AM