शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आपण सर्व भाऊ-भाऊ, रेतीचा पैसा वाटून खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:00 AM

जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदीपुर्वीच शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करुन ठेवली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये तस्करी जोमात : प्रशासन म्हणते संयुक्त कारवाई, लिलावापूर्वी रेती साठविण्याची तस्करांमध्ये लागली स्पर्धा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील वैनगंगेच्या खोऱ्यातील रेती उत्कृष्ट दर्जाच्या रेतीची तस्करांनी वारेमाप वाट लावली आहे. रोज शेकडो ट्रॅक्टर व ट्रकांद्वारे रेतीची अवैध वाहतूक होत आहे. हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाला माहित असूनही ‘आपण सर्व भाऊ - भाऊ, रेतीचा पैसा वाटून खावू’ या आशयाने सर्व कार्य सुरळीत सुरु आहे. आतापर्यंत रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने याचा फायदाही तस्करांनी चांगलाच उचलला आहे.जिल्ह्यात दशकभरापूर्वी ९० पेक्षा जास्त रेतीघाट होते. परंतु गोसेधरणात पाणी अडविल्यानंतर रेतीघाटांची संख्या कमी झाली. दुसरीकडे जिल्ह्याची जीवनदायीनी समजली जाणारी वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांमधून राजरोसपणे रेतीची तस्करी केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे रेती तस्करांनी बंदीपुर्वीच शेकडो ब्रास रेतीचा उपसा करुन नदी काठावरील शेतशिवारात, जंगलात व अन्य ठिकाणी साठा करुन ठेवली आहे. याच डम्पिंग केलेल्या रेतीवर कधीकधीच महसूल प्रशासनाची नजर जात असते. जप्त केलेल्या रेतीचीही त्याच कंत्राटदाराला विक्री करण्याचा अफलातून प्रकारही घडला आहे.भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रेतीघाट परिसर अतिसंवेदनशील झाले असून वाळू माफीया येथेच अधिक सक्रीय आहेत. याच भागातून मोठ्या प्रमाणात नागपूरसह अन्य जिल्ह्यात रेतीचा पुरवठा होत असतो. याशिवाय तुमसर, मोहाडी, भंडारा व साकोली तालुक्यातही रेतीची तस्करी सुरु आहे. बंदी असतानाही रेतीची डम्पींग झालीच कशी असा प्रश्न उपस्थित करुन यासाठी महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाविना हा प्रकार घडला कसा यावरही चिंतन करायला हवे.रेतीतस्करांवर संयुक्त कारवाईरेतीचे अवैध उत्खनन व वाहतूकीवर महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करावी या आशयाचे निर्देश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. रेती वाहतुकीचा आढावा घेण्यासंदर्भात ही बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी पोलीस विभागासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते. जिल्ह्यातील रेती अन्य जिल्ह्यासह परराज्यात जात असल्याने याची दखल घेत पालकमंत्र्यांनी यावर कारवाई करण्यासंदर्भात सुचना केली असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची कितपत अंमलबजावणी होते, ही येणारी वेळ ठरविणार आहे. विशेष म्हणजे पवनी, निलज, जवाहरनगर, आंधळगाव व हिवरा या चेकपोस्टवर संबंधित तहसीलदारांनी एक कर्मचारी नियुक्त करावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच निलज-नागपूर-तामसवाडी या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिले.७१ रेतीघाटांचे लिलावरेती घाट लिलाव करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ऐन पावसाळ्यात लिलाव प्रक्रिया सुरु झाली असली तरी ती पुर्णत्वास जाण्यास अजून महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. मात्र गत चार महिन्यांपासून रेतीच्या अनधिकृत उपस्याने जिल्हा प्रशासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व तस्करांच्या संगनमताने हा सर्व प्रकार घडत असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील ७१ रेतीघाटांचे लिलाव करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु झाली आहे. पर्यावरण समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर अंतिम रुप देण्यात येईल.- रा.ल. गजभिये,जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया