लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे. मुठीत जीव घेवून येथील कर्मचारी कार्य करीत असून या केंद्राच्या अत्याधुनिकीकडे जलसंपदा उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे.पाटबंधारे विभाग, जलसंपत्ती विभाग अंतर्गत येणाऱ्या जलसंपदा उपविभागांतर्गत भंडारा तालुक्यातील कारधा येथे हवामान केंद्र स्थापित करण्यात आले आहे. सालेबर्डी मार्गावर स्थित असलेल्या या कार्यालयाची अवस्था बिकट होत चालली आहे.झाडाझुडूपांनी वेढलेले हे कार्यालय सहसा नजरेस पडत नाही. या हवामान केंद्राच्या कार्यालय परिसरात चार सदनिका, साहित्य ठेवण्याचे गोदाम व कार्यालयासमोरच्या मोकड्या जागेत तापमान तथा वारा मोजमापक यंत्र स्थापित आहेत. तापमान यंत्र असलेली जागाही झाडाझुडपानी वेढलेली आहे.अशी स्थिती हवामान केंद्राची इमारत तथा सदनिकांची आहे. केंद्राच्या कार्यालयाचे प्रवेशद्वार लाकडी असून ते वाकलेल्या स्थितीत आहे. कार्यालयाचे स्लॅब भिंतीला झुकलेले आहे.कार्यालय सभोवताल असलेली भिंतीला तडे गेले आहेत. शौचालयाची अत्यंत दुरवस्था आहे. या हवामान केंद्राच्या मागील बाजुला रस्ता चौपदरीकरणांतर्गत महामार्ग गेला आहे. परिणामी मागील बाजूची स्वच्छता करण्यात न आल्याने येथील कर्मचारी विषारी श्वापदांच्या भितीत कामे करीत आहेत.येथे दररोज दोन वेळा तापमान, पर्जन्यमान, वारा मोजमाप याची नोंद केली जाते. येथे नोंद करण्यात आलेली माहिती नागपूर विभागाकडे पाठविली जाते. हीच माहिती राज्यस्तरावर उपलब्ध केली जाते. त्यामानाने या कार्यालयाची दुरुस्ती अथवा आधुनिकीकरण होणे महत्वाचे आहे.राज्य शासनाच्या सर्वच विभागाने आधुनिकीकरणाकडे कात टाकली आहे. मात्र, हवामान केंद्राचे कार्यालय आजही अडगळीत आहे. हे केंद्र अपवाद ठरले आहे. या केंद्राच्या आधुनिकीकरणाकडे जलसंपदा विभाग गांभीर्याने लक्ष देणार काय? असा प्रश्न उपस्थित होते.
हवामान केंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 10:07 PM
जिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे. मुठीत जीव घेवून येथील कर्मचारी कार्य करीत असून या केंद्राच्या अत्याधुनिकीकडे जलसंपदा उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : दुरूस्तीसाठी निधीची वानवा