शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

व्यवहारावर परिणाम तरीही नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत

By admin | Published: November 10, 2016 12:45 AM

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सामान्य नागरीकांच्या ...

कही खुशी कही गम : सुट्या पैशांसाठी झाली धावाधाव, वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची उडाली धांदलवरठी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सामान्य नागरीकांच्या जीवनात यु-टर्न घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. भंडारा जिल्ह्यात सकाळपासून मानवी मेंदुत ‘केमीकल लोचा’ निर्माण झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होती. प्रधानमंत्र्यांच्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत असताना दैनंदिन व्यवहार कसा चालवायच्या या चिंतेने अनेकांचे बेहाल होताना दिसून आले. दिवसभर अफवांमुळे सामान्य नागरिकांची अवस्था भरडल्यासारखी झाली होती.काल मध्यरात्रीपासून ५०० व १००० च्या नोटा भारतीय चलनातून हद्दपार झाल्यामुळे आज थोडा उत्साह आणि काहीशी नाराजी पहावयास मिळाली. प्रवास आणि खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातातील नोटा जसेच्या त्या तसे पहावयास मिळाले. अनेकांनी चिल्लरसाठी दारोदार भटकताना दिसले. काही जण स्वत:चे म्हणणे पटवून देण्यासाठी आणि आपले म्हणणे सांगण्यासाठी हुज्जत घालण्यासोबत भांडतानाही दिसून आले. ५०० व १००० च्या नोटा व्यवहारातून हद्दपार झाल्याचे कळताच अनेकांनी गैरसमजातून व्यवहार केले नाही. नोटा बदलण्याची पर्यायी व्यवस्था आणि असलेल्या नोटा त्यांच्या खात्यात जमा करता येतात याकडे नागरीक व व्यवसायिकांचे दुर्लक्ष झाल्यामुळे चिल्लर व्यापाऱ्यांनी सामानाची विक्री केली नाही. अनेकजण १० रूपयाचे सामान घेण्यासाठी ५०० च्या नोटा दुकानात नेत असल्यामुळे दुकानदार आणि ग्राहकात जुंपल्याचे दृश्य दिसून आले. किरकोळ व्यावसायिक व लहान व्यापाऱ्यानी ५०० व १००० च्या नोटा न स्वीकारल्यामुळे व्यवहार ठप्प पडल्यागत झाला होता. आठवडी बाजारात तणावजिल्ह्यातील विविध भागात आज आठवडी बाजार होता. आठवडी बाजारात येणाऱ्यांनी ५०० व १००० च्या नोटा दुकानदारांना दाखवल्यामुळे तणावाची स्थिती दिसली. बाजारात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाजवळ ५०० रूपयांच्या नोटा होत्या. सामानाच्या मोबदल्यात द्यावे लागणाऱ्या सुटे पैशामुळे तारांबळ उडत होती. यामुळे अनेकांना विकत घेतलेले सामान परत करावे लागले होते.रेल्वे स्थानकावर तारांबळभंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या तिकीट विक्री केंद्रावर मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. १० रूपयांच्या तिकीटासाठी ५०० च्या नोटा वापरून तिकीट मागणाऱ्यांची गर्दी होती. चिल्लर मुबलक प्रमाणात नसल्यामुळे अनेकजण तिकीट विक्री केंद्रावर हुज्जत घालत होते. दरम्यान, सकाळी रेल्वे स्थानकावर फेरफटका मारला असता एक महिला मुलासह गावाला जाण्यासाठी आॅटोरिक्शाने आली. जवळ चिल्लर पैसे नसल्यामुळे आॅटोचालकाला चिल्लर देण्यासाठी तासभर विनवणी करीत होती. २० रुपयांच्या तिकीटासाठी ५०० चे नोट व त्यामोबदल्यात चिल्लर नसल्यामुळे निराश झाली होती. अखेर आॅटो चालक पैसे न घेता निघून गेला. शेवटी काहींनी मध्यस्थी केल्यामुळे चिल्लर व तिकीट मागून दिल्यामुळे त्या महिलेला समोरचा प्रवास करता आला.चिल्लर द्या हो चिल्लर!अचानक व्यवहारातुन हद्दपार झालेल्या नोटांमुळे सामान्य नागरीकांवर चिल्लर पैसासाठी दारोदार भटकण्याची वेळ आली. मनस्ताप दिसला परंतु, प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होताना दिसून आले. वस्तुच्या मोबदल्यात पैसे आणि पैशाच्या मोबदल्यात वस्तुचा व्यवहार चलनी नोटाच्या तुटवड्यामुळे ठप्प होता. घरातील लहानांपासून ते मोठ्यापर्यत सर्वांकडूनच चिल्लर देता का हो? चिल्लर अशी विनवणी करतानाचा प्रकार दिसून आला. चॉकलेट करीता ५०० ची नोटघरातील चिमुकली चॉकलेट बिस्कीटकरीता आईबाबाकडे नेहमी पैसे मागतात. कधी-कधी चिल्लर नाही , म्हणून पैसे देत नाही. पण आज अनेकांनी चिमुकल्याना खाऊसाठी ५०० च्या नोटा दिल्या. उलट चिल्लर आणण्यास बाकीचे पैसे देण्याचे आमिष त्यांना देण्यात आले. कधी नव्हे तेवढ्या सहजतेने पैसे मिळाल्याचा आनंद घेऊन चिमुकले दुकानाच्या चकरा मारत होते.चिंताग्रस्तांची धावपळनोटा रद्द झाल्याचा आनंद सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असला तरी चिंताग्रस्त चेहऱ्यांची धावपळ मात्र पहावयास मिळाली. काळा पैसा म्हणून किंवा शासनापासुन लपवून होणाऱ्या व्यवहारासाठी घरात असलेल्या पैशांची चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सकाळपासून व्यावसायिकांच्या सल्लागारांचे फोन खणखणत होते. पेट्रोल पंपावर लुटरद्द झालेल्या नोटा काही दिवस पेट्राल पंपच्या व्यवहारात सुरु राहणार असल्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी दिसत होती. यात अनेकांचा उद्देश चिल्लर करायचा होता. परंतु पेट्राल पंपावर चिल्लर पैशांचा ठणठणाट असल्यामुळे ग्राहकांना दिलेल्या नोटाच्या कीमतीचा पेट्रोल भरावा लागला. एकंदरीत १०० च्या तुलनेत अनेकांनी वाहनांची टँक भरून पैसे चलनात वापरले. यामुळे पेट्रोल पंपावर गर्दीसह ५०० व १००० च्या नोटांची गर्दी वाढली. (वार्ताहर)