लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या महापूरात येथील शासकीय गोदामातील तब्बल सहा हजार २६३ क्विंटल धान्य ओले झाले होते. या धान्याला दुर्गंधीही सुटली होती. प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. त्यामुळे या धान्याची विल्हेवाट लावता आली नाही. आजही महापूरात ओले झालेले धान्य शासकीय गोदामात पडून आहे.वैनगंगा नदीला २९ व ३१ ऑगस्ट रोजी महापूर आला होता. या महापूराने भंडारा शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. शेकडो हेक्टर जमीन आणि घरांना याचा फटका बसला. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पुरवठा विभागाच्या तीन पैकी दोन गोदामात पुराचे पाणी शिरले. या दोन्ही गोदामात पाच ते सहा फुट पाणी होते. विशेष या गोदामात १७ हजार क्विंटल धान्य ठेवलेले होते. त्यात तांदूळ नऊ हजार ४७२ क्विंटल, गहू सहा हजार २१५ क्विंटल, तूर डाळ ७०० क्विंटल, चना डाळ ५४५ क्विंटल, हरभरा सहा क्विंटल आणि साखर १४४ क्विंटलचा समावेश होता. महापूरात तांदूळ ३८२६ क्विंटल, गहू १८३३ क्विंटल, तूर डाळ २६६ क्विंटल, चना डाळ १८८ क्विंटल, हरभरा सहा क्विंटल आणि महापूरात संपूर्ण साखर विरघळून गेली होती.ओले झालेले धान्य वाचविण्यासाठी तात्काळ वाळविण्यासाठी गोदामाबाहेर काढले होते. परंतु त्याला प्रचंड दुर्गंधी सुटली. आता पूर उलटून दोन महिने झाले तरी हे धान्य आजही गोदामात पडून आहे. त्या मागचे कारण म्हणजे नागपूर आणि पूणे येथील प्रयोग शाळेत पाठविलेला अहवाल अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाला नाही. आता हे धान्य मानव अथवा जनावरास खाण्यायोग्य आहे की नाही या अहवालाची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे तहसील प्रशासनाने पुणे येथील आरोग्य सेवा संचालक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सहायक संचालक पशूसंवर्धन रोग संशोधन शाखा व पशू संवर्धन प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले आहे. यासोबतच नागपूर येथील प्रयोगशाळेतही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तांदूळ, गहू, तूरडाळ, हरभरा, साखर यांचे प्रत्येकी ५० किलोचे नमुने पाठविण्यात आले.महापुरात ओले झालेल्या धान्याचे नमुने पुणे आणि नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. नागपूरचा अहवाल प्राप्त झाला असून पुण्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल प्राप्त होताच तात्काळ धान्याची विल्हेवाट लावली जाईल.- साहेबराव राठोड,तहसीलदार, भंडाराधान्य खाण्यास अयोग्यभंडारा तहसील प्रशासनाने नागपूर येथाील प्रयोग शाळेत पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर अहवालानुसार ओले झालेले धान्य मानवास खाण्यास अयोग्य असल्यास अहवाल प्राप्त झाला आहे. महापूरातओले झालेले धान्य आता जनावरांच्या खाण्यास योग्य आहे की नाही याची प्रशासनाला प्रतीक्षा असून त्यानंतरच त्याची विल्हेवाट लावली जाईल. मात्र तोपर्यंत गोदामात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.
महापुरात ओले धान्य अद्यापही गोदामातच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 5:00 AM
वैनगंगा नदीला २९ व ३१ ऑगस्ट रोजी महापूर आला होता. या महापूराने भंडारा शहरासह जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. शेकडो हेक्टर जमीन आणि घरांना याचा फटका बसला. यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या पुरवठा विभागाच्या तीन पैकी दोन गोदामात पुराचे पाणी शिरले. या दोन्ही गोदामात पाच ते सहा फुट पाणी होते. विशेष या गोदामात १७ हजार क्विंटल धान्य ठेवलेले होते.
ठळक मुद्देप्रयोगशाळा अहवालाची प्रतीक्षा : सहा हजार क्विंटल धान्य, वैनगंगा नदीच्या महापुराचा फटका