शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

ओल्या पार्टीत मित्रांनीच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 5:00 AM

अभिनय ऊर्फ अभिमन्यू नंदकिशोर माने (२३), रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, असे मृत तरुणाचे नाव आहे. बघेडा येथील कुलदीप डोंगरे याच्या घरी सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुलदीपचे नागपूर येथील चार मित्रही सहभागी झाले होते. तेथे अभिनयलाही बोलाविण्यात आले होते. त्यानुसार अभिनय तुमसरमधील आपल्या दोन मित्रांना घेऊन बघेडा येथे गेला. पार्टी सुरू असताना आठ दिवसांपूर्वी आंबागढ येथे झालेल्या भांडणाचा मुद्दा निघाला.

ठळक मुद्देबघेडा येथील घटना : रॉड व चाकूने खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आठवडाभरापूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी ओल्या पार्टीत बोलावून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना तुमसर तालुक्यातील बघेडा येथे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मध्यरात्रीच्या सुमारास रॉडने वार करून आणि चाकूने भोसकून खून करण्यात आला. त्यानंतर गावालगतच्या नाल्यात मृतदेह फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनय ऊर्फ अभिमन्यू नंदकिशोर माने (२३), रा. आंबेडकर वॉर्ड तुमसर, असे मृत तरुणाचे नाव आहे. बघेडा येथील कुलदीप डोंगरे याच्या घरी सोमवारी रात्री पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुलदीपचे नागपूर येथील चार मित्रही सहभागी झाले होते. तेथे अभिनयलाही बोलाविण्यात आले होते. त्यानुसार अभिनय तुमसरमधील आपल्या दोन मित्रांना घेऊन बघेडा येथे गेला. पार्टी सुरू असताना आठ दिवसांपूर्वी आंबागढ येथे झालेल्या भांडणाचा मुद्दा निघाला. त्यातून अभिनयसोबत वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने एकमेकांना मारहाण सुरू झाली. वाद चिघळत असल्याचे पाहून अभिनयच्या तुमसर येथील दोन मित्रांनी पळ काढला. इकडे अभिनय रात्रभर घरी आला नाही त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. गोबरवाही आणि तुमसर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. अभिनयचा खून झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यावरून पोलिसांनी शोध सुरू केला. बघेडा गावाजवळील नाल्यात अभिनयचा जळालेला मृतदेह आढळून आला. अभिनयचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळला असावा, असा संशय पोलिसांना आहे. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

एक तरुण ताब्यात; नागपूरच्या मित्रांचा शोध सुरू

अभिनयच्या खून प्रकरणात कुलदीप डोंगरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजेच त्याच्याच घरी या ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, तसेच पोलिसांचे एक पथक नागपूर येथे रवाना झाले असून, कुलदीपच्या नागपूर येथील मित्राचा शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. त्यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अधिक तपास गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस