महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:17 AM2019-08-28T01:17:34+5:302019-08-28T01:18:25+5:30
अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाच वर्षांपूर्वी राज्यावर दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते आता पाच लाख कोटींवर पोहचले आहे. प्रत्येक शासकीय विभागात दीड लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपचे सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट रचत आहे, असा घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
अमरावती येथून सोमवारी प्रारंभ झालेली महापर्दाफाश यात्रा मंगळवारला दुपारी १ वाजता भंडारा जिल्ह्यात दाखल झाली. शहरातील साखरकर सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सभापती प्रेम वनवे, शिशीर वंजारी, कैलाश भगत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, शाम पांडे, धनराज साठवणे, डॉ.ब्राम्हणकर, टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
तर प्रचाराची भूमिका महत्त्वाची
साकोली विधानसभा क्षेत्रातून आपली उमेदवारी आहे काय? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठांना याबाबत मी आपली भूमिका कळविली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून लढविण्यापेक्षा प्रचार कार्यात सहभागी होणे महत्वाचे आहे. हीच भूमिका महत्वाची असून काँग्रेसला बळकट करणे हेच माझे ध्येय असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.