लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील १८ गट ग्रामपंचायतचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ मध्ये संपणार असून, निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक गट ग्रामपंचायतला मिळाली नाही. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. सोबतच ७९ ग्रामपंचायतचे आरक्षण घोषित करण्यात येत आहेत. ही संधी गट ग्रामपंचायतला प्राप्त होत नाही. गट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी होत आहे.
तुमसर तालुक्यात ९७ ग्रामपंचायत आहेत. १८ गट ग्रामपंचायतच्या निवडणुका जानेवारी महिन्यात घेतल्या जात आहेत. जानेवारी २०२१ मध्ये गट ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये गट ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. परंतु गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले नाही.
गट ग्रामपंचायतींना सरपंचपदाची थेट निवडणूक मिळाली नाही. ८९ ग्रामपंचायतला थेट सरपंचपदाची दोनदा संधी मिळाली आहे. परंतु गट ग्रामपंचायतला एकदाही संधी मिळाली नाही. गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढताना तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले जात आहेत. सरपंचपदाचे आरक्षण घोषित केल्यानंतर ८९ गावांतील नागरिकांना सरपंचपद आरक्षित माहिती होत आहे. २ वर्षांचे आधीच माहिती होत असल्याने गावातील इच्छुक या दिशेने तयारी करीत आहेत.
दोन वर्षांचे आधीच आरक्षण घोषित करण्याची संधी गट ग्रामपंचायतला प्राप्त झाली पाहिजे. परंतु या दिशेने निर्णय घेतले जात नसल्याने गट ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या गावात नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका गट ग्रामपंचायतला बसला आहे.सदस्यांनी सरपंच पदावर निवड केली आहे. गावात थेट निवड प्रक्रियेची संधी गट ग्रामपंचायतला मिळणार असल्याने सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी गावातून होत आहे.
गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले पाहिजे. सरपंचपद थेट निवडणुकीची संधी तालुक्यातील गट ग्रामपंचायतला मिळाली नाही. ही संधी ८९ ग्रामपंचायतला मिळाली आहे. गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आल्यानंतर गावकऱ्यांना आधीच सरपंचपदाचे आरक्षणाची माहिती होईल.- देवेंद्र मेश्राम, अध्यक्ष, सरपंच संघटना, तुमसर.