अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामवासी ही मागणी करीत आहेत परंतु प्रशासन मात्र त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. वाकेश्वर फाट्यावर भंडारा येथे शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी असतात. ते रोज येजा करीत असतात, त्यासोबतच अनेक व्यवसाय करणारे व नोकरी करणारे लोकसुद्धा दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे त्यांना बसची वाट पाहत फाट्यावरती ताटकळत उभे राहावे लागत असते. सोबतच महिला वर्गांनासुद्धा अनेकदा तासन् तास उभे राहायची वेळ येत असते. या परिसरात कुठेही प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रवाशांची कुचंबणा होत असते. स्थानिक लोकांनी बऱ्याचदा ही मागणी लोकप्रतिनिधींकडे बोलून दाखवली. परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही .
लोकांची गरज लक्षात घेता व प्रवाशांची अत्यावश्यक बाब लक्षात घेता बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधीनी या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे आणि ही निकडीची समस्या पूर्ण करावी, अशी मागणी आहे.