शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

तुमसर-बपेरा मार्गावरून जाताना जीव असतो मुठीत

By राहुल गायकवाड | Published: May 22, 2024 3:16 PM

विभागाचे दुर्लक्ष: जड वाहतुकीने रस्त्याची झाली चाळण

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बपेरा-तुमसर राज्य मार्गावर जड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिणामी रस्त्यावरून पादचाऱ्यांना व दुचाकी वाहन चालविणाऱ्या नागरिकांना पदोपदी मृत्यू जवळ आल्याचा भास होत आहे.

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या बपेरा परिसराला बावनथडी व वैनगंगा नदीचे वरदान लाभले आहे. परिणामी, दिवसरात्र रस्त्यावरून रेतीचे ओव्हरलोड ट्रक धावत असतात. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर गावातील घरे राज्यमार्गालगत असल्याने नागरिक आणि लहान मुलांचा संचार असतो. राज्य मार्गावरून वाहनांची भरधाव वर्दळ सुरू राहत असल्याने अपघाताची जणू श्रृंखला सुरू राहते. मात्र, अद्यापपर्यंत राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आलेला नाही.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतरित झाल्याने संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरून अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्रीही प्रवास करतात. मात्र, त्यांच्या ताफ्यालाही खड्डे समजत नाही काय, हा प्रश्न आहे. राज्यमार्ग खड्यात गेला असल्याने नागरिकांत आक्रोश आहे. या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाला केली आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हा रस्ता आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतरित झाल्याने या रस्त्याबद्दल उत्तराला मी बांधील नाही, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता चौधरी यांनी दिले. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे नागरिकांत व वाहनचालकात कमालीचा असंतोष आहे. या असंतोषाला बांधकाम विभागामुळे खतपाणी मिळत आहे. परिणामी असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमसर सिहोरा-बपेरा परिसरात असणारे मार्ग व रस्ते सामान्य जनतेला ये-जा करताना त्रासदायक ठरत आहेत. या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी प्रशासनाची उदासीनता दिसून येते. संबंधित विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.- हिरालाल नागपुरे, उपसभापती, पंचायत समिती, तुमसर. 

टॅग्स :bhandara-acभंडाराtumsar-acतुमसरroad transportरस्ते वाहतूक