लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे.गत अनेक वर्षापासून या प्रवासी निवाऱ्याची मजबुत भिंत आणि छत मात्र बनू शकले नाही. यासाठी पुढाकार धेण्याची गरज आहे. शाळेचे सत्र सुरू झाले असून रोज अड्याळला हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. परंतु जेव्हा केव्हा विद्यार्थी तथा प्रवासी या प्रवासी निवाºयात उन वारा पावसाळ्यापासून बचाव व्हावा अशी अपेक्षा मात्र भंग पावताना दिसते.प्रवासी निवारा येथेच व्हावा अशी कल्पना तथा चर्चा गावात असली तरी त्यासाठी येथील ग्रामपंचायत, नेते मंडळी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते. परंतु आजपर्यंत यापैकी कुणाच्याही हाताला यश आले नाही. मागील वर्षात जेव्हा नवनियुक्त सरपंच व सदस्यांनी याच प्रवासी निवाºयाकडे लक्ष देवून काम केले होते तेव्हा ग्रामस्थांनाही विश्वास होता की आतातरी पक्का प्रवासी निवारा होणार परंतु आजही चार खांबावर ताडपत्रीच्या मांडवात प्रवाशांना ऊन, वारा, पावसात जीव धोक्यात ठेवून उभे राहावे लागते.बस थांबा परिसरात विद्यार्थी तथा प्रवाशांची एवढी गैरसोय होत असतानाही कुंभकर्णी झोपेचे सोंग घेवून गप्प बसणारे आतातरी जागे होणार काय, लोकप्रतिनिधी तथा ग्रामपंचायत प्रशासन यावर तात्काळ कोणती दखल घेणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. दिवस उन्हाचे असोत वा पावसाचे किंवा सोसाट्याचा वारा यापासून स्वत:चे बचाव व्हावे यासाठी येथील प्रत्येक प्रवाशांची धडपड नेहमीच पाहायला मिळत असते.प्रवासी निवारा तयार होवू शकत नाही काय, ग्रामपंचायत प्रशासनाने एका निवेदनाद्वारे प्रवासी निवारा यासाठी जागा व बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना दिल्याची माहिती आहे.भकास झालेल्या प्रवाशी निवाºयाचा विकास शेवटी लोकप्रतिनिधीच्या निधीतून की लोकवर्गणीतून होणार हे वेळच ठरवणार असली तरी तात्काळतेने या प्रश्नाला सोडविणे आवश्यक झाले आहे. यासाठी पाठपुरावा नियमीतपणे होणे हेही तितकेच सत्य आहे.
अड्याळला प्रवासी निवारा मिळणार केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:00 AM
भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची दमछाक : समस्येकडे सर्वांचेच दुर्लक्ष