शेतकरी सावकाराच्या द्वारी : तोमेश्वर पंचभाई यांची मागणी चिचाळ : पवनी तालुक्या उन्हाळी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ८५ लाख १० हजार ५४२ रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी खरीप हंगामासाठी मोठ्या संकटात सापडला असून हंगामाला पैसे आणावयाचे कुढून, रोवणीसाठी व्याजाने पैसे काढण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे शिल्लक चुकारे देण्याची मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. पवनी तालुक्यातील काळी कसदार जमीनीने या भागाला चौरास म्हणून ओळख आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. असे शेतकरी खरीप हंगामातील शेतीला येणारा खर्च हा उदात्त हेतू ठेवून व्याजाने रक्कम काढून उन्हाळी धान उत्पादन घेतो. मात्र दोन तीन वर्षापासून रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामात पिकाच्या उत्पादनात घट होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय संकाटत आलेला आहे. शेतकरी नागावला जात आहे. शेतकऱ्यांची निसर्गाच्या पावसाने व शासनानेही थट्टा केली आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. शेतकऱ्यांचे उन्हाळी धान हंगामाचे ६ कोटी रुपये अडून आहेत. खरीप हंगाम तोंडावर आहे. खरीप हंगामाच्या धानपिकाच्या रोवणीसाठी कुणाकडे हात पसरावे असा सवाल शेतकरी करीत आहेत. आपलेच पैसे असूनही शासन उन्हाळी हंगामातील धान चुकारे का देत नाही? यालाच म्हणायचे का शेतकऱ्यांचे अच्छे दिन असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात ३६,३४२ क्विं. धान खरेदी झाली यामध्ये चिचाळ ३६५६.८० क्विंटल, पवनी ७६५२.८० क्विं., आसगाव १३०७५.८. क्विं, कोंढा ८५८८ क्विं., धानाची खरेदी करण्यात आली. सदर आधरभूत केंद्राकडून ६ जुलैपर्यंत चुकारे मिळतील असे सांगितले असले तरी अद्याप चुकारे न मिळाल्याने धान विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले ओहत. व कर्जाचे व्याज वाढतच आहे. आधीच नापीकी वेळेवर चुकारे नाही स्वत:चा माल स्वत:च चोर अशा कैचीत शेतकरी सापडला आहे. मात्र निवडणूकीच्या वेळी विकासाचे तुनतुने वाजविणारे पुढारी मात्र शेतकऱ्यांसाठी आवाजा का उढवत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. जगाच्या पोशिंदाचे शासन चुकारे अडवून बसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला आहे. मात्र शेतकऱ्याचे आंदोलने, उपोषणे, मोच्र काढून ढेंगा मिरविणारे पुढारी मात्र गप्प का असा प्रश्न सुज्ञ शेतकरी करीत आहेत. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे चुकारे दयावे अशी मागणी पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई यांनी केली आहे. तालूक्यात पहिलेच शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असताना व धानाचे चुकारे झाले नसल्याने शेतकऱ्यांनी व्याजी रक्कम घेऊन धान बिजायत घेतले मात्र बऱ्याच कंपनीचे धान उगवले नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बरीच शेती पऱ्हे नसल्याने पडीत राहणार आहे. तालूका कृषी अधिकारी यांनी शेतावर जावून पंचनामा करुन संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना एकूण खरीप हंगामाचे उत्पादन घेण्यात यावे अन्यथा त्या कंपनीला तालूक्यात प्रवेश करु देणार नाही. - तोमेश्वर पंचभाई, पं.स. सदस्य पवनी
धानाचे चुकारे केव्हा मिळणार?
By admin | Published: July 15, 2016 12:49 AM