व्यथा बळीराजाची : दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही फायदा नाही करडी (पालोरा) : धानावे भाव गडगडले आहेत. बाजार समित्यांमध्ये वेळेवर धानाला उचल मिळत नाही. धानाला भाव नाही. बोनस दिला गेला नाही. सन २०१४-१५ दुष्काळग्रस्त घोषित केल्यानंतरही त्याचे फायदे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणात जमिनी पडीत राहूनही त्याचा मोबदला देण्याची घोषणा करण्याचे सौजन्य शासनाने दाखविले नाही. भांडवलदार, उद्योगपती, व्यापाऱ्यांचे लाखो करोडोंचे कर्ज माफ करणारे शासनाने मात्र, विश्वासघात केल्याचा व थट्टा चालविल्याचा आरोप जि.प. सदस्या सरिता चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरोधी पक्षालाही शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसत आहे. शेतकरी दुष्काळाने, अल्प उत्पादन व कमी मिळणाऱ्या भाव होरपळला असताना, रोज आत्महत्या करत असताना, सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रास्ता, रोको किंवा अन्य आंदोलन होताना दिसत नाही. विरोधक आजही सत्तेत असल्याचा तोरयात असल्याचे दिसत आहे. विरोधाचे राजकारण काँग्रेस व राष्ट्रवादी सारखे जिल्ह्यातील प्रमुख पक्ष विसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील त्यांची सत्ता खिळखिळी झालेली आहे. फक्त जिल्हा परिषदे पुरते राजकारण आजच्या विरोधकांकडे शिल्लक आहे. मात्र अजुनही त्यांची सत्तेशी नशा उतरलेली दिसत नाही. विरोधकांच्या नैराश्यपुर्ण वातावरणामुळेच शेतकऱ्यांचे बुरे दिन आल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून हो आहे. भाजपाने अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. नोटबंदीमुळे मागच्या वर्षापेक्षा धानाचे भाव गडगडले आहेत. सन २०१४-१५ मध्ये जिल्हा दुष्कळग्रस्त घोषित केल्याप्रमाणे त्याचे फायदे शेतकऱ्यांना देण्यात यावे, यावर्षीच्या पडित जमिनीला मोबदला देण्याची घोषणा करावी, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारयंचे लाखो कराडोंडे कर्ज माफ करणारे शानाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे, महादेव बुरडे यांनी केली आहे. (वार्ताहर) धानाला ५०० रूपये बोनसची मागणी नोटबंदीमुळे धानाला किंमत उरलेली नाही. भाव पडले आहेत. बाजार समित्यामध्ये व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण नाही. मागच्या वर्षीपेक्षाही स्थिती नाजुक झालेली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धानाला प्रति क्विंटल ५०० रूपये बोनस जाहीर करावा, शेतकऱ्यांप्रती सहानुभूती दर्शवावी, अशी मागणी भारतीय किसान संघाचे यादोराव कापगते यांनी केली आहे. खा. नाना पटोले यांनी धानाला बोनस जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केलेली मागणी स्वागतार्ह आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज केव्हा माफ होणार?
By admin | Published: January 02, 2017 1:30 AM