शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

शेतकऱ्यांची आर्त केव्हा ऐकू येणार !

By admin | Published: April 03, 2016 3:49 AM

जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे.

जोहार मायबाप जोहार : शासनाकडून बोळवण, कर्जाखाली दबला पोशिंदाप्रशांत देसाई भंडाराजगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटले जाते, तो पुरता कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. एकीकडे निसर्गाचा सततचा लहरीपणा दुसरीकडे शासनाने त्यांच्याकडे फिरविलेली पाठ. निसर्ग व शासनाच्या फेऱ्यात सापडलेला शेतकरी आता जगायचे कसे? या विवंचनेत अडकला आहे. परिणामी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याची गावे दुष्काळग्रस्त यादीत आली नाही. त्यामुळे त्यांचे कर्जमाफ होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना सावकारांकडे हात पसरावे लागत आहे. शेतात पिकणारे धान्य हेच शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असताना त्यांचे भवितव्य पूर्णत: निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा चातकासारखी वाट बघत असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने, अवसान व मनोधैर्य खचू लागते. पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजिविकेच्या शोधात तरूणवर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. लोकप्रतिनिधी आणि सरकार या दोघांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण होतो. पाऊस पडला नाही तर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केली असती तर शेतकऱ्यांना काही सवलती मिळू शकतील, एवढीच शेतकऱ्यांना आशा होती. परंतु मायबाप सरकारने तेही केले नाही. कष्ट करूनही दुष्टचक्राचा फेरा कायमशेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही आपलेपणाने लक्ष देत नाही. त्यामुळे काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागत नाही. त्यातून व्यसनाधीनता व आत्महत्या या चक्रात शेतकरी अडकतो. मुलीचे लग्न करताना शहरातील नोकरदाराला ‘मागेल तो हुंडा देऊन करू’, पण गावातील शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, अशीही मानसिकता तयार होते. शेतकरी मागून मागून काय मागतात तर शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा भाव.मुक्या जनावरांवरही संकटपाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वाधिक हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात. शेतमालाला हमीभाव नसतो. उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते. जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीशेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला सरसकट माफी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र, हे आश्वासन पुर्णत्वास गेले नाही. त्यामुळे आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना कर्जबाजारीच राहण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी पुढाकार घेत पीक लागवड व शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेची अंमलबजावणी करून स्वयंरोजगार देण्यासाठी सुनिल फुंडे हे धडपडत आहेत.