भंडारा विभागात सहा आगार आहेत. तुमसर, गोंदिया आणि भंडारा येथून आंतरराज्यीज बससेवा सुरु होती. मध्यप्रदेशातील आणि छत्तीसगड राज्यातील शहरात नियमित बसेस धावत होत्या. बऱ्यापैकी उत्पन्नही मिळत होते. परंतु आता केवळ छत्तीसगड राज्यातील गोंदिया-डोंगरगड ही एकमेव बससेवा सुरु आहे. मध्य प्रदेश सरकारने ४ ऑगस्टपर्यंत आंतरराज्यीय वाहतुकीला बंदी घातली आहे. त्यामुळे त्यानंतरच बससेवा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रवाशी मात्र या बसेसची प्रतीक्षा करीत आहेत.
सीमेवरील गावात सोडले जात असल्याने गैरसोय
आमचे सर्व संबंध मध्य प्रदेशातील गावाशी आहे. अनेक नातेवाईक मध्यप्रदेशात राहतात. परंतु कोरोना संसर्गापासून बससेवा बंद आहेत. नातेवाईकांच्या गावी जाण्यासाठी खासगी वाहने भाड्याने करावे लागते. परंतु ते शक्य नाही. ही सेवा लवकर सुरु व्हावी.
- रमेश आस्वले,
प्रवाशी.
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील शहरात येणे-जाणे होत होते. तेथून साहित्य खरेदी करुन महाराष्ट्रात त्याची विक्री केली जात होती. परंतु आता बससेवा बंद असल्याने आमचा व्यवसायही ठप्प झाला आहे. महामंडळाने एसटी बससेवा सुरु केल्यास आम्हाला त्याचा फायदा होईल.
-राजू कुंभरे, प्रवाशी
मध्य प्रदेश सरकारने ४ ऑगस्टपर्यंत आंतरराज्यीय प्रवेशबंदी केली आहे. कोरोना संसर्गामुळे ही सेवा बंद आहे. परंतु लवकरच ही सेवा सुरु करण्याचे प्रयत्न आहेत. कोरोना संसर्ग वाढला नाही तर बससेवा नियमित होण्यास कोणतीच अडचण नाही.
-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी
परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच
तुमसर-कटंगी
साकोली-बालाघाट
गोंदिया-बालाघाट
तुमसर-वारासिवनी
सध्या सुरु असलेल्या रातराणी
गोंदिया-डोंगरगड (एसटी महामंडळाची छत्तीसगडमध्ये जाणारी एकमेव बस)