शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

उत्पादनावर आधारित भाव मिळणार कधी?

By admin | Published: November 22, 2015 12:30 AM

शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत.

गरज आधाराची : धान उत्पादक शेतकऱ्यांची चहुबाजूने कोंडीभंडारा : शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला योग्य भाव मिळावा त्याचप्रमाणे शेतमाल विक्रीमध्ये फसवणूक होवू नये यासाठी आधारभूत किंमती ठरवून दिल्या आहेत. मात्र ज्या मुल्यांकनाने शेतमालाची आधारभूत किंमत ठरविण्यात आली, त्यामध्ये शेतमाल उत्पादकांवर अन्यायच केला जातो. शेतमालाला देण्यात येणारा भाव शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासारखा आहे. ज्या भावामध्ये शेतमालाची विक्री करावी लागते ते भाव परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबल्याची भावना आहे.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यामध्ये मुख्यत्वे धानाचे पीक घेतले जाते. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून या परिसरातील शेतकरी विविध प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या धानपिकांचे उत्पन्न घेत असतात. परंतु धान उत्पादक शेतकरी प्रगतीऐवजी अधोगतीकडेच जात असल्याचे चित्र आहे.शेतकरी खरीप हंगामात जवळपास पाच ते सहा महिने कुटुंबासोबत राबत असतो. रब्बी हंगामातही राबून शेती कसत असतो. मात्र त्याला हव्या त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. शेतकरी कर्जाच्या ओज्याखाली दबला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंगणीक वाढ होत आहे.यासाठी शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या परिसरामध्ये सिंचनाच्या सोयी नाहीत. बी-बियाणे, खत मजुरी, कीटकनाशके, औषधी यांचे भाव गगणाला भिडले आहे. धानाला योग्य हमी भाव मिळत नसल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येऊन शेतकरी तोट्यात शेती व्यवसाय करीत आहे. उत्पन्न कमी झाले तरी कर्ज काढून शेतकरी दरवर्षी चांगले उत्पादन होण्याच्या आशेने शेती करतो. परंतु निसगार्चा लहरीपणा आणि धान पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव, जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पीककर्ज भरण्याचे संकट निर्माण झाले आहे. उत्पादन झाले नसल्याने बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. त्यामुळे मृत्यूला कवटाळण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही, अशी स्पष्ट चिंता बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसते. देशाचा कणा समजला जाणाऱ्या जगाच्या पोशींद्याचे कर्ज माफ करावे तेव्हाच तो ताठ मानेने उभा राहील, असे मत शेतकऱ्यांचे आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरजपालांदूर : विदर्भातील चार जिल्ह्यातील धानाचा शेतकरी शासन प्रशासनाच्या तुघलकी धोरणाने कमाल अडचणीत आला आहे. निसर्गाचा भार सहता सहता धान पिकवायचे आणि विकायला गेले तर बारा भानगडी उभ्या राहायच्या. यामुळे धान उत्पादक लोकप्रतिनिधीवर कमालीचा नाराज झाला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात हलक्या व जाड धानाची मळणी हंगाम व विक्री हंगाम जोमात आला आहे. शासनाने १ नोव्हेंबरपासून हमी केंद्र सुरु करण्याचा आदेश दिला. प्रशासनाकडून अंमलबजावणी करू न शकल्याने शेतकऱ्यांनी अर्धाअधिक माल खासगीत १२०० रुपयात विकला. आजचे लोकप्रतिनिधी धानाचे उत्पादक आहेत. समस्यांशी निगडीत आहे. परंतु सकारात्मक निर्णय घेत धान उत्पादकांना यथोचित न्याय देण्यात मागे पडत असल्याने शेतकरी संकटात असून त्याला सावरण्याची गरज आहे. पुढच्या महिन्यात धान पट्ट्याच्या जवळ उपराजधानीत दिवाळी आयोजन नियोजित आहे. जिल्ह्यातील आमदारांनी स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याची का गरज आहे, हे शासनाला पटवून देत प्रतिक्विंटल ३०० रुपयाच्या वर बोनसमिळवून देण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे अशी आग्रही मागणी धान उत्पादकांची आहे. मातीतला धान सन्मानाने जगात विकला पाहिजे. हे शक्य आहे. पण राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.