शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

ग्रामीण भागात शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 4:36 AM

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून ...

बारव्हा : कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत बंद करण्यात आलेल्या शाळा पुढे संक्रमण कमी झाल्यानंतरही काही सबबी सांगून दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. काहींचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. मात्र गरिबांच्या मुलांना ही सुविधाही मिळाली नाही. घरी राहून विद्यार्थ्यांसह पालक वैतागले आहेत. आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्यामुळे राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय कधी घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाही झाल्या नाहीत. त्यानंतर जून-२०२१ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. परंतु शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या नाहीत. जुलैमध्ये शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच १७ ऑगस्टपासून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. टास्क फोर्सच्या इशाऱ्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच दिवाळीनंतर या शाळा सुरू होण्याचे संकेत राज्य शासनाने दिले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर लग्न, हॉटेल, बार, दुकाने, मॉल, बस, रेल्वे यासह इतर बाबींना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची शासनाने परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचा आरोप काही शिक्षणतज्ज्ज्ञांनी केला आहे. प्रशासन व तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

टास्क फोर्समधील तज्ज्ञांचा शाळा सुरू करण्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे शाळा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बॉक्स बालमनावर विपरीत परिणाम शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकर ठोस निर्णय घेत नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा नसल्याने ऑनलाईनच्या नावावर शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये शालेय विद्याथ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती काही शिक्षकांनी दिली असून, याला पालकांसह डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. मुलांच्या वर्तनात बदल जाणवत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षणातील रुची कमी मुले घरी असल्याने ती पालकांसोबत रोज गर्दीत जात आहेत. काही शेतातील कामे करतात तर काही गटागटाने खेळत असतात. यात त्यांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययोजनांचे भान नसते. त्यांचा संपूर्ण वेळ खेळण्यात जात असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची शिक्षणातील रुची कमी होत असल्याचेही पालकांनी सांगितले, याबाबत शिक्षकांच्या संघटना आक्रमक भूमिका न घेता गप्प असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे.

कोट

कोरोना संक्रमण कमी झाले की निर्बंध उठविले जातात. वाढले की करण्याबाबत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा लावले जातात. हाच निकष शाळेला लावून शाळा सुरू कराव्यात.

- महादेव खटके, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारव्हा.

शाळा बंद असल्याने मुले आमच्यासोबत लान, बारसे, बाजार, इतर घरगुती कार्यक्रमात येतात. आम्ही दिवसभर शेतात असतो, तेव्हा मुले घोळक्याने गावात खेळतात. शाळा सुरू झाल्या तर ते शाळेत सुरक्षित राहतील व शिक्षणही होईल. त्यामुळे सरकारने लवकर शाळा सुरू कराव्यात.

-रवी झोडे, पालक