राज्यमार्ग रुंदीकरण काम सध्या जोमात सुरू आहे हे काम घावर कन्स्ट्रक्शन कंपनीला आहे, काम युद्धस्तरावर सुरू आहे राज्यमार्ग बांधकामात महामार्ग प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे ,काम पूर्ण झालेल्या अनेक ठिकाणी राज्यमार्गावर मोठ्या भेगा पडलेल्या आहेत कोंढा ते पालोरा(चौ) या दरम्यान जवळपास २० ठिकाणी भेगा आहेत. यावरून कामाचा दर्जा कसा असेल हे लक्षात येते. राज्यमार्ग रुंदीकरणासाठी ३०० कोटी रुपये अंदाजपत्रक असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले पण सुरुवातीपासून कामावर शासकीय परवानगी शिवाय मुरूम, माती मोठ्या प्रमाणात खनिज वापरण्यात आले आहे. राज्यमार्ग रुंदीकरणात दरम्यान कारधा ते निलज मार्गाची देखभाल कंपनीकडे आहे परंतु नेरला गावापासून दवडीपार (बाजार) गावपर्यंत रोग पूर्णपणे उखडला असून देखील त्याची देखभाल करण्याकडे कंपनीचे पूर्णता दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाने जातांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या कामासाठी कंत्राटदार कंपनी सुरुवातीपासून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत आहे.
सिमेंट बांधकाम करण्यापूर्वी मुरूम मातीमिश्रीत वापरले जात आहे याची ओरड लोकांनी केली होती, पण याकडे लक्ष दिले नाही, राज्यमार्ग रुंदीकरण करण्यास सिमेंट मसाला बनविण्यासाठी कंपनीने प्लान्ट चुल्हाड(कोसरा) येथे उभारला आहे .येथे रात्रीच्या वेळेस रेती वाहतूक करून आणली जाते ,ती साठवून ठेवली जाते .भंडारा जिल्ह्यातील सर्व रेती घाटाचे लिलाव झाले नसताना कंपनीला कामासाठी रेती कोठून मिळते असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहेत. अवैध वाळू उपसा करणारे लोक यांच्या सोबत संबंध असल्याचे बोलले जात आहे, पण महसूल विभाग झोपल्याचे सोंग घेत कोणतीच कारवाई करीत नाही , त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल शासनाचा डुबत आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी केली तर पाळेमुळे समोर येऊ शकतात. तेव्हा लोकप्रतिनिधी यांनी हा प्रश्न उपस्थित करण्याची मागणी जनतेनी केली आहे.