शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

पद असो अथवा नसो शेतकरी चळवळीला कायमच प्रथम प्राधान्य राहणार - राजु शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 5:38 PM

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : मुळात माझा पींड राजकारणाचा नाही. शेतकरी हितासाठी संघर्ष करणारा मी ...

- सुधीर चेके पाटीललोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मुळात माझा पींड राजकारणाचा नाही. शेतकरी हितासाठी संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्याकडे एखादे पद असो किंवा नसो शेतकरी चळवळीला प्रथम प्राधान्य देणारा मी आहे. जिल्हा परीषद सदस्य, आमदार, खासदार या पदावर असतांनाही शेतकºयांच्या समस्यांसाठी कायम लढा दिला. त्यामुळे लोकसभेतील विजय किंवा पराभव याला फारसे महत्व नाही. खासदार असतांना लोकसभेत शेतकºयांचे प्रश्न मांडत होतो. आता ते प्रश्न रस्त्यावर उतरून मांडावे लागतील एवढाच काय तो फरक. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना प्रतिक्र ीया दिली. नुकतेच दोन दिवस ते बुलडाणा जिल्ह्याच्या दौºयावर होते. त्यावेळी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा मुद्दा घेऊन त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या.प्रश्न : लोकसभेच्या एकंदरीत निकालाबाबत काय सांगाल ?देशभरात लोकसभेचा लागलेला निकाल अनाकलनीय आहे. भाजप विजयी झाल्याचे प्रत्यक्ष दिसत असले तरी अप्रत्यक्षपणे हा ईव्हिएमचा विजय असल्याचे माझे मत आहे. शेकडो मतदार संघात प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा मतमोजणीत मते जास्त भरलेली आहेत. विशेष म्हणजे सर्वच ठिकाणी हि लिपीकीय चूक असल्याचे कारण सांगीतले जाते. लिपीकीय चूक आहे तर सर्वच ठिकाणी जास्त मते कशी भरली, कमी का नाही. त्यामुळे ईव्हिएम बाबत नुसतीच शंका नव्हे तर ईव्हिएम मध्ये घोळ केल्याची खात्री आहे. या विरोधात जन आंदोलन छेडण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.प्रश्न : सत्ताधारी भाजपला सोडून जाण्याचा निर्णय चुकला का ?अजिबात नाही ! भाजपला सोडण्याचा मुळीच पश्चाताप नाही. सगळ्यात जास्त शेतकºयांचे वाटोळे याच सरकारच्या काळात झाले आहे. उद्योगपती व बड्या व्यापाºयांचे चोचले पुरविणारे हे सरकार आहे. हे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे नाही. हे लक्षात आल्यावर तडकाफडकी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही जेव्हा भाजपला सोडचिठ्ठी दिली. तेव्हा निवडणुकीचा विषय सुध्दा नव्हता. प्रश्न : भाजपाने पुन्हा आॅफर दिली तर सोबत जाणार का ?भाजप आणि शिवसेना यांच्याशी पुन्हा युती करण्याचा प्रश्नच येत नाही. मी आधीच सांगीतले हे सर्व सामान्य जनता व शेतकरी विरोधी विचारधारेचे लोक आहे. त्यामुळे जेथे शेतकरी हित नाही तेथे जायचेच कशाला. मी तत्वाने राजकारण करणारा माणूस आहे. राजकारण हा माझा पोटापाण्याचा धंदा नाही. शेतकºयांसाठी संघर्ष करणे माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे शेतकरी चळवळीला बाजुला सारून सत्तेला जवळ करणाºयांपैकी नाही.प्रश्न : तुम्हाला रोखण्याचा डाव साधला गेला किंवा वंचीत मुळे घात झाल्याचे वाटते का ?घात झाला असे नाही. मात्र वंचीतमुळे मतांची विभागणी झाली हे खरे आहे. माझ्या विरोधात अत्यंत खालच्या स्तरावर व चुकीचा प्रचार केला गेला. जातीयवाद पुढे करून मतांचे ध्रुवीयकरण करण्यात आले. प्रचंड प्रमाणात पैशांचा वापर या निवडणुकीमध्ये झाला. हजारो मतदार मला भेटून आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचे सांगतात. मग त्यांची मते गेली कुठे? त्यामुळे ईव्हिएम बाबतही शंका आहेच. हा माझा एकट्याचा पराभव नसून शेतकºयांचा, कष्टकºयांचा पराभव आणि ईव्हिएमचा विजय आहे. प्रश्न : विधानसभेसाठी आघाडी सोबतच राहणार काय?अजुन याबाबत निर्णय झालेला नाही. परंतू भाजप शिवसेना सरकार विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येवून महाआघाडी करावी असे माझे मत आहे. आमच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करून या बाबत निर्णय घेतला जाईल. प्रश्न : वंचीत व मनसेला सोबत घेण्याची तयारी आहे का ?होय तयारी आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही पक्ष महाआघाडीत सहभागी होणे आवश्यक आहे. या संदर्भात मी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सगळे विरोधी पक्ष एकत्र येवून लढू अशी विनंती त्यांना केली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही मी लवकरच भेट घेणार आहे. त्यांनाही भाजपाला खरोखरच हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्यास वंचीतनेही त्यांच्या सोबत येणे गरजेचे आहे. प्रश्न : संघटनेची पुढील दिशा काय ?राजकारण हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ महत्वाची आहे. त्यामुळे शेतकरी हितासाठी आम्ही नव्या दमाने लढा उभारू. तरूणांचे संघटन मजबुत करू. नव्या चेहºयांना अधिक संधी देण्याचा आमचा माणस आहे. प्रश्न : येणाºया विधानसभेबाबत काय ? विधानसभा लढविण्याची आमची तयारी आहे. २५ मतदार संघात उमेदवार तयार आहेत. या जागा आम्ही पुर्ण ताकदीनीशी लढवू.प्रश्न : रविकांत तुपकरांना विधानसभेत उतरविणार का व कोणत्या मतदार संघातून?या बाबत मी आताच काही सांगू शकत नाही. रविकांत तुपकर महाराष्ट्राचे नेते आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेत प्रचारासाठी राज्यभर फिरावे लागणार आहे. अशा परीस्थीतीत त्यांना विधानसभेत उतरवायचे कि नाही आणि उतरवायचे असल्यास कोणत्या मतदार संघात उतरवायचे या बाबत कोअर कमीटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.
टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीbuldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना