आॅनलाईन लोकमतभंडारा : पदवी शिक्षण अभ्यासक्रमातील एका विषयातील प्रात्यक्षिकाचे (प्रॅक्टीकल) गुण वाढवून देण्यासाठी प्रयोगशाळा परिचराला दोन हजारांची स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विनोद मारोतराव नक्षुलवार असे या परिचराचे नाव असून तो येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात कार्यरत आहेत. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी केली.तक्रारदार भिमराव मेश्राम यांचा मुलगा जे.एम. पटेल महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. पहिल्या सत्राची महाविद्यालयातर्फे परीक्षा दिली. यात सुशांत मेश्राम याला प्रथम सत्रांत परीक्षेत समाजशास्त्र या विषयात इंटरनलचे फक्त एक (१) गुण मिळाले. यासंदर्भात प्रयोगशाळा परिचर याला विचारपूस केली असता, नक्षुलवार याने इंटरनलचे गुण वाढवून देण्यासाठी मेश्राम याच्याकडे दोन हजार रूपयांची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविली. यात एसीबीने सापळा रचून सोमवारी दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना नक्षुलवार याला रंगेहात पकडले.भंडारा पोलिस ठाण्यात विनोद नक्षुलवारविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. या कारवाईसाठी एसीबीचे पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर, पोलिस निरिक्षक योगेश्वर पारधी, संजय कुरंजेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, शेखर देशकर, पराग राऊत, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक यांनी सहभाग नोंदविला.
लाच घेताना प्रयोगशाळा परिचराला रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:10 PM
पदवी शिक्षण अभ्यासक्रमातील एका विषयातील प्रात्यक्षिकाचे (प्रॅक्टीकल) गुण वाढवून देण्यासाठी प्रयोगशाळा परिचराला दोन हजारांची स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ठळक मुद्देपटेल महाविद्यालयातील प्रकार : लाचुलचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई