शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

अवैध वाहतुकीवर ‘वचक’ कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:05 PM

१४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर वाहतूक शाखा नियंत्रण केव्हा वचक बसविणार? असा सवाल आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाचा अभाव : निधीचीही वानवा, राज्यमार्गावर खुलेआम वाहतूक, धूम स्टाईलनेही वाढताहेत अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर वाहतूक शाखा नियंत्रण केव्हा वचक बसविणार? असा सवाल आहे.भंडारा जिल्ह्यात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे. अशात लोकसंख्येच्या दृष्टीकोणातून प्रवाशांची संख्याही मोठी आहे. त्यात एस.टी. च्या बसफेरीचा अभावामुळे अवैध वाहतूक फोफावली आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे व नियमबाह्य वाहन चालवित आहेत अशांविरुद्ध आमचे काहीही म्हणणे नाही. मात्र परवाना नसलेले वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात कोंबून त्यांची वाहतूक करीत आहेत. अशावेळी अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे.विशेषत: जिल्ह्यातून गेलेल्या पाचही राज्य मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रस्थ वाढले आहे. तीन सीटर असो की दहा सीटर क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. नियमांना बगल देऊन ही कारवाई खुलेआम सुरु आहे. जिल्हा मुख्यालयात वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे सर्वच ठिकाणी सर्वच मार्गावर नियंत्रण ठेवणे आवाक्याबाहेर आहे. तरीही वर्षभरात वाहतूक शाखेमार्फत जनजागृती करून अपघातांवर आळा कसा बसेल यावर नियंत्रण केंद्रीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अपघातप्रवण स्थळी मार्गदर्शक सूचना, फलक व आवश्यक असलेल्या ठिकाणी रिफ्लेक्टरची गरज आहे. काही ठिकाणी या सुविधा लावण्यातही आल्या आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या राज्य मार्गावरील वळणांवर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. मात्र नियमात वाहनचालविणाऱ्यांनाही विनाकारण गोवण्यात येत असल्याच्याही तक्रारीत वाढ झाली आहे.सध्या लग्नसराईची धुम आहे. अशावेळी ट्रॅक्टर, ट्रक किंवा आॅटोमध्ये वºहाड्यांची ने आण केली जाते. वळणांवर वाहन चालकांचे नियंत्रण गेल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. अशावेळी सावधगिरी बाळगणे महत्वाचे असतानाही व वेळोवेळी अपघातांच्या संख्येत वाढ होऊनही लोकांना त्यातून समज मिळालेली दिसत नाही. याकडे पोलीस विभागाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची गरज आहे.