प्रकरण रेती तस्करीचे : वरिष्ठांची बघ्याची भूमिका!साकोली : रेतीघाटांचे लिलाव झाले असले तरी पैशाच्या भरोश्यावर साकोली तालुक्यात रेतीचा अवैध गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. शासनाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र पोलीस विभागातील ‘एक’ अधिकारी रेतीमाफीयांकडून हप्ता घेत असून त्या रात्री दरम्यान रेतीची अवैध वाहतुक सुरु असल्याची चर्चा आहे.साकोली तालुक्यात फक्त तीन रेतीघाटांचा लिलाव झाला असून इतर तीन रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. ज्या रेतीघाटचा लिलाव झाला आहे त्या रेतीघाटावर रॉयल्टीची किंमत एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे एक हजार रुपये जास्त घेतात. या कारणावरुन रेतीतस्कर रेतीघाटावरुन रेती आणण्याऐवजी अवैध मार्गाने रात्री रेतीची चोरी करतात. व स्तस्त दराने रेती विकतात. यात ग्राहकांचा जरी फायदा झाला तरी शासनाचा कोट्यवधींचा महसुल बुडत आहे.महसुल विभागाचे अधिकारी हे फक्त दिवसाच फिरत असतात तेही पहाटे पाच ते सकाळी दहा वाजेपर्यंत नंतर तलाठी, मंडळ अधिकारी व तहसिलदार आपआपल्या कार्यालयात जाऊन बसतात. सायंकाळी बरेच तलाठी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यामुळे रात्री महसुल विभागाचे एकही अधिकारी रेती तस्करी थांबविण्यास असमर्थ ठरले आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आहे.रात्री गस्तीवर पोलीस असतात. पोलिसानी आपल्याला पकडू नये या भितीमुळे काही रेती तस्करांनी पोलिसांना आपल्या मर्जीत आणले आहे. एवढेच नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हप्ता वसुली निश्चित करण्यात आली असून ज्यांच्याकडून हप्ता जात आहे. त्या रेतीतस्करांचा ट्रॅक्टरला पकडलाच जात नाही. एखाद्या पोलिसाचे हे ट्रॅक्टर पकडल्यास त्याला कार्यवाही न करता ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश देण्यात येते अशीही चर्चा खुद्द पोलिस कर्मचाऱ्यांकडून ऐकीवात आहे तर काही पोलीस कर्मचारीच याची तक्रार वरिष्ठांना करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांकडे तक्रारसाकोली तालुक्यातील या अवैध रेती तस्करीची व अवैध हप्ता वसुलीची तक्रार मुख्यमंत्र्याकडे गोपनीय पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मुख्यालयी राहण्याची सक्ती करासाकोली तालुक्यातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकारी हे मुख्यालयी न राहता साकोली, लाखनी, भंडारा या ठिकाणी राहतात. त्यामुळे सकाळी ११ ते ५ पर्यंत आपली नोकरी करुन रेतीतस्करांना रान मोकळे सोडतात. त्यामुळे जिल्हाधिकारी या प्रकरणात स्वत: लक्ष घालुन मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे अशी मागणी आहे.पोलीस चौकशीही सुरु करारेतीघाटानजीक व ज्या टेकडीवरुन गिट्टीचे खणन केले जाते, त्या ठिकाणी पोलीस चौकी सुरु करण्यात यावी. प्रत्येक ट्रॅक्टरची रॉयल्टी तपासण्यात येऊन तारीख व वेळ पाहण्यात यावी. जेणेकरुन एका रॉयल्टीचा उपयोग एकाच वेळी घेता येईल.
पैसे घेणारे ‘ते’ अधिकारी कोण?
By admin | Published: March 11, 2017 12:24 AM