लाखांदूर : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले यांचा मोबाईलवर हुबेहूब आवाज काढून अधिकाऱ्यांना वेठीस धरणारा तो कोण, अशी चर्चा सध्या लाखांदूर तालुक्यात सुरू आहे.
मोबाईलवर नाना पटोले यांचा हुबेहूब आवाज काढून अधिकारी तसेच अवैध व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. मोबाईल करताना ‘मी नाना पटोले बोलतोय’ असे स्पष्ट सांगून अधिकाऱ्यांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेमका हा भाऊ कोण अशी चर्चा सध्या लाखांदूर तालुक्यात रंगली आहे. हुबेहूुब आवाजाला अनेक अधिकारी फसत असून अशा दिशाभूल करण्याच्या प्रकारामुळे जनमानसातही संभ्रम निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. हा प्रकार गत काही दिवसांपासून सुरू असून आता त्याचे लवकरच बिंग फुटणार असल्याची चर्चा आहे.