शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

राष्ट्रवादीची उमेदवारी कुणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:40 PM

नामांकन दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

ठळक मुद्देपोटनिवडणूक : उमेदवार ठरले असले तरी घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नामांकन दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. असे असले तरी राष्ट्रवादीकडून खा.प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाताई पटेल यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विजय शिवणकर हेसुद्धा संभाव्य उमेदवार असू शकतात.येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपनेही अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करू, असे राष्ट्रवादीला वाटत आहे तर राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करू, असे भाजपला वाटत आहे. अशातच दोन्ही पक्षाकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसून ज्यांचा उमेदवार पहिले घोषित होईल? त्यावरून दुसरा पक्ष उमेदवारीची घोषणा करणार असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.सध्या स्थितीत कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देईल? हे पक्षश्रेष्ठींनी ठरविले असले तरी घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. ज्याच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा करावयाची आहे, त्याचे समाजात किती प्राबल्य आहे? याची चाचपणी भाजप व राष्ट्रवादीकडून होत आहे.राष्ट्रवादी १० मे रोजी दाखल करणार नामांकनकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची घोषणा ९ मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या दोन्ही पक्षातील पदाधिकारी निर्णय घेणार आहेत. त्यानंतर १० मे रोजी राष्ट्रवादीचा उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहे. त्यासाठी सकाळी १० वाजता जलाराम मंगल कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दोन्ही पक्षाकडून करण्यात आले आहे.दि.१० मे रोजी भाजप उमेदवारही नामांकन दाखल करणार असल्यामुळे गुरूवारला दोन्ही पक्षाचे शक्तीप्रदर्शन दिसून येणार आहे.भाजप ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेतराष्ट्रवादी कोणत्या समाजातील कार्यकर्त्याला निवडणूक रिंगणात आणते? याकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थितीत भाजपकडे माजी आमदार हेमंत पटले, माजी खासदार शिशुपाल पटले, खुशाल बोपचे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार घोषित न केल्यामुळे भाजपने आपले पत्ते उघडलेले नाही. तरीसुद्वा नामांकनासाठी करावी लागणारी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.युतीचा अद्याप निर्णय नाहीकाँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा करून दोन दिवस झाले असतानाही भाजप व शिवसेनेची युती अद्याप झालेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील की एकत्र हेसुद्धा अद्याप निश्चित झाले नाही. युती झाली नाही तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.