बुद्ध विहारात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तुळशीदास फुंडे होते. शिक्षिका सुनीता हलमारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच जितेंद्र कठाणे, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी पर्यवेक्षक श्रीकांत सपाटे, राखी सपाटे, माविमच्या पर्यवेक्षिका चंद्रप्रभा बावणे, उमेद प्रभाग समन्वयक निखिल जुमळे, श्रावण सपाटे, परसराम शेंडे, रोहिणी कोरे, चैतन्य ताराबाई कोरे, ज्योती मेश्राम, उमेद समन्वयक (सीआरपी) नीलिमा कठाणे, अर्चना कठाणे, माधुरी ज्ञानेश्वर कापगते, शालू कोरे, ऋतुजा हत्तीमारे, वैशाली कोरे, मंजुषा चुटे, सरिता फुंडे, सुहासिनी शिवणकर, पपिता कोरे, मंगला काळे, अतुल ब्राह्मणकर, बनाबाई कठाणे, आशा कोरे, ज्योती कोरे, दुर्गा मानकर, चारू कोरे, सुनंदा कठाणे, भाग्यश्री हत्तीमारे, जिजाबाई कापगते, दामिनी कोरे, गीता कोरे उपस्थित होते.
मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शेतीचे काम करणाऱ्या महिलांनी सावित्रीबाईंच्या जीवनाला शब्दबद्ध करत उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. संचालन रोहिणी कोरे यांनी केले. प्रास्ताविक नीलिमा कठाणे यांनी केले. ज्योती मेश्राम यांनी आभार मानले.