शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

रेती तस्करांना राजाश्रय कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 5:00 AM

रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढले आहे. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे १५ ते २० तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या रेतीव्यवसायात अनेक माफियांचा शिरकाव झाला असून कोणतीच कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल गेली आहे. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याने रेती तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुलेआम सुरू असलेल्या या रेती तस्करीला राजाश्रय कुणाचा, असा प्रश्न आता पुढे येत आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या रेती सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून रेतीचे बेसुमार उत्खनन केले जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीघाटांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे या घाटांवर तस्करांचा ताबा आहे. अहोरात्र उत्खनन करून नागपूर आणि मध्य प्रदेशात रेतीची वाहतूक केली जाते. या व्यवसायात काही पक्षांचे कार्यकर्ते रेती तस्करीत उतरले आहेत. शेकडो ब्रास रेतीचे चोरटे उत्खनन केले जाते. रेती तस्करांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी महसूल विभागाची आहे. जिल्ह्यातील महसूल विभागाने यासाठी पथकही तयार केले आहे. मात्र या तस्करांना राजाश्रय लाभत असल्याने अधिकारी बोटचेपी भूमिका घेतात. कारवाईचा केवळ देखावा केला जातो. त्यामुळेच तस्करांचे मनोबल वाढले आहे. त्यातून हल्ल्याच्या घटना घडतात. पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे १५ ते २० तस्करांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. गत महिनाभरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा वचपा म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. लाखनी तालुक्यातील झरप येथे शनिवारी लाठ्याकाठ्या घेऊन रेती तस्कर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या मागे लागले होते. सुदैवाने यात दुखापत झाली नाही. तर तीन वर्षापुर्वी मोेहाडी तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर तस्करांनी हल्ला केला होता. इतर ठिकाणीही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र ठोस कारवाई होत नाही.

रेती तस्करांचे मोठे नेटवर्क- रेती तस्करांनी स्थानिक तरुण व महसूल विभागातील कार्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठे नेटवर्क तयार केले आहे. कोणत्या अधिकाऱ्याचे वाहन कोणत्या घटाकडे जात आहे याची तत्काळ माहिती रेती तस्करांना मिळते. त्यामुळे कुणी अधिकारी प्रामाणिकपणे कारवाईसाठी गेला तर रेती तस्कर पसार झालेले असतात. जिल्ह्यातील रेतीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुचाकीस्वार अहोरात्र ठिय्या देऊन असतात. रेतीचे वाहन पकडले तर काही वेळातच ही मंडळी तेथे गोळा होतात. हातात लाठ्याकाठ्या असतात. पथकावर दबाव टाकतात. २० ते २५ संख्येने असलेल्या या टोळक्यापुढे काहीच चालत नाही. कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकाचे लोकेशन या रेती तस्करांना कसे मिळते हा संशोधनाचा विषय आहे.

हे आहेत कुप्रसिद्ध घाट- भंडारा जिल्ह्यात अनेक कुप्रसिद्ध घाट असुन त्यात पवनी तालुक्यात खातखेडा, भोजापुर, गुडेगाव, कुर्झा, इटगाव, धानोरी, मांगली, वलनी, तुमसर तालुक्यात देवनारा, सोंड्या, तामसवाडी, बपेरा, आष्टी, वारपिंडकेपार, ब्राम्हणी, चारगाव, मोहाडी तालुक्यात रोहा, बेटाळा, मोहगाव, पाचगाव, निलज, नेरी तर लाखांदुर तालुक्यात इटान, नांदेड, मोहरना, विहिरगाव, टेंभरी, चप्राड, आसोली आथली, मांढळ, भागडी, चिचोली, धर्मापुरी, बोथली, दिघोरी मोठी या घाटांचा समावेश आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी