लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. त्याचा दुचाकीवरचा वावरही वाढला आहे. पंरतु शहरातील वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक होत असताना सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे सोडून तरुणीनी हेल्मेटलाच नाकारले आहे. याबाबत शहराचा अभ्यास केला असता पुरुषाच्या तुलनेत फारच कमी महिला वा तरुणी हेल्मेट वापरत असल्याचे निदर्शनास आले.म्हणे, सोबत बाळगायला त्रास जातो!आजच्या धकाधकीच्या जीवनात शहरी संस्कृतीमध्ये बरची कामे ही वाटून घेतली जातात. नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर गाडी चालवतातच पण नोकरी न करणाºया स्त्रियादेखील अनेक कारणामुळे गाडी चालवताना आपण नेहमीच पाहतो. मग गाडी टू व्हीलर असो वा फोर व्हीलर... महिलाच गाडी चालविण्याचे प्रमाण पुरुषाप्रमाणेच वाढत आहे. पण तुलानात्मकदृष्ट्या गाडी चालवतान महिला या पुरुषापेक्षा कमी प्रमाणात हेल्मेट वापरतात. पण, त्याचा वेग मात्र कुठेही कमी नसतो, अशा स्थितीत अपघात घडल्यास मोठी इजा होऊ शकते. हेल्मेट हे वापरायला व बाळगायला सोपे नसते, हे अगदी मान्य परंतु या एका कारणामुळे हेल्मेट नाकारुन स्वत:चा जीव धोक्यात टाकणे हे शहानपणाचे लक्षण अजिबात नाही. याबाबत सदर प्रतिनिधीने शहरातील तरुणीच्या प्रतिक्रया घेतल्या तेव्हा त्यानीही हेल्मेटचे महत्व मान्य केले पण, कॉलेज, शिकवाणी वर्गास जायचे असल्यास हेल्मेट सोबत घेऊन फिरायला त्रास होत असल्याचे सांगितले.वाहन चालविताना हेल्मेट वापरणे गरजेचेखरतर प्रत्येकाचा जीव हा त्याला महत्त्वाचा वाटत असतो, मग ती महिला असो वा पुरुष, म्हणूनच गाडी चालवताना हेल्मेट हे वापरायलाच हवे. याबाबत महिलांना विचारले असता त्याविषयीची एवढी जागरुकता नाही, हेल्मेट ठेवायला आणि वापरायला संकोच वाटतो, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे.अनेक वेळा गाडी चालवून झाल्यावर हेल्मेट ठेवायचे कुठे, हा प्रश्नच पडतो. पण कारणे काहीही असोत गाडी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुणीच विसरता कामा नये. हेल्मेट हे वाहन चालकाना अपघातापासून बचावात्मक सुरक्षा प्रदान करते. त्यामुळे हेल्मेटचे महत्त्व आहे.विविध क्षेत्रात महिला कार्यरत असून देखील त्यांना हेल्मेट वापरणे योग्य वाटत नाही, जोपर्यंत स्वत:च्या मनातून हेल्मेट न वापरण्याचा विचार जात नाही. तोपर्यंत आपण हेल्मेट घालूच शकत नाही. त्यामुळे हेल्मेटची सक्ती करण्यापेक्षा स्वत:च स्वत:ला सक्ती करणे आवश्यक आहे.-यशोधरा वासनिक, भंडारामी हेल्मेट वापरते, कारण मला गाडी चालवताना हेल्मेट घातल्यामुळे सुरक्षित वाटते, जर माझे नातेवाईक हेल्मेट वापरुन गाडी चालवू शकतात. तर मी देखील चालवू शकते. महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवल्यास अॅक्सिडेंटच्या त्रासातून आणि वेदनातून वाचता येऊ शकते.-पूनम शाहू, लाखनी
हेल्मेट वापरण्याला तरुणींचा नकार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:44 PM
सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालवताना हेल्मेट वापरणे फारच गरजेचे आहे. परंतु आजही अनेकांना हेल्मेट हे ओझेच वाटते. तरुणीच्या बाबतीत विचारले तर त्यांना हेल्मेट अगदीच नको असते.
ठळक मुद्देदुचाकी सुसाट : पण हेल्मेटचा मात्र कंटाळा