शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आगीत तणीस जळून खाक वणव्यात वनसंपदा स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2017 12:27 AM

तुमसर शहरापासून एक किमी अंतरावरील शेतात भीषण आगीत लाखोंचे तणीस व काही शेतमाल जळून खाक झाला.

तुमसर : तुमसर शहरापासून एक किमी अंतरावरील शेतात भीषण आगीत लाखोंचे तणीस व काही शेतमाल जळून खाक झाला. आग धगधगताना परिसरात खळबळ उडाल्याने पळापळ झाली. ही घटना तुमसर-कोष्टी शिवारात गुरूवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. तुमसर व भंडारा येथील अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. तुमसर कोष्टी शिवारात शेतातील तणसीच्या ढिगांना आग लागली. आगीचे डोंब शेत शिवारात दिसत होते. आगीचे तांडव दोन ते तीन तास सुरु होते. तुमसर येथील शेतकरी माधोराव पटेल, मनोज नागुपरे, प्रदीप बावनकर, अनिल बेसरकर, नितीन झाडे या शेतकऱ्यांच्या शेतातील तणीस व शेत माल आगीत भस्मसात झाला. प्रदीप बावनकर यांचा शेतात पोल्ट्री फार्म आहे. त्यांनी नगरसेवक पंकज बालपांडे यांना आगीची माहिती दिली. त्यांनी तुमसर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला सांगितले. अग्निशामक दल घटनास्थळी रवाना झाले. आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी भंडारा येथील अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. तीन तासानंतर आग आटोक्यात आली. आगीत शेतातील लाखो रूपयांची तणीस जळून स्वाहा झाली. घटनास्थळापासून एक किमी अंरावर तुमसर शहर आहे. सध्या शेतशिवार वाळलेले आहे. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते. शेकडो नागरिकांनी तुमसर शेतशिवारात धाव घेतली होती. दोन दिवसांपूर्वी शेत शिवारात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. शार्टसर्किटमुळे ही आग तर लागली नसावी ना? अशी चर्चा घटनास्थळावर सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)