लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.वन्यजीवांचा अभयारण्य शेजारी बफरझोनमध्ये तसेच पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर अनेक वन्यप्राणी एकत्र जमत असल्याने हिच ठिकाणे शिकाऱ्यांसाठी मोक्याचे ठरत आहेत. प्राणी चारा व पाण्याच्या शोधात शेतशिवारात व गावरस्त्यांकडे धुमाकूळ घालत असून वनविभागानी सजगता दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य प्राण्यांच्या विविधतेने समृध्द आहे. तृणभक्ष्य प्राण्याबरोबर हिंस्त्र प्राण्यांची संख्या ही जास्त असल्याने येथे कृत्रीम पाणवठे तयार करण्याची गरज आहे.परंतु वनविभाग डोळे झाक करीत असून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वनविभागाची अत्यंत महत्वाची भुमिका आहे. ऐन उन्हाळ्याच्या पर्वावर प्राण्यांची भटकंती चिंताजनक ठरत आहे. पाणवठ्यावरील प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता बळावली आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या त्रासांमुळे शेतकरीही विद्युत करंटने प्राण्यांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत.कोका अभयारण्याला लागून भंडारा, मोहाडी, लाखनी, साकोली तालुक्याच्या सीमा असून येथे मोठी वनसंपदा आहे.प्राण्यांचा रहिवास येथे कायम असल्याने अनेक ठिकाणी पाणवठे तयार करण्याची गरज वाढली आहे. परंतू जिल्हा प्रशासन देखील जैवविविधते संदर्भात ठोस उपाययोजना राबवित नसल्याने प्राण्यांचा अधिवास धोक्यात येत आहे.त्यामुळे चारही बाजुला वन्यजीवांचा बफर झोन परिसरात रहिवासी दिसून येतो. पाण्याच्या शोधात असलेले हरिण, रानडुकर, निलगाय हे गोसेखुर्दच्या खोल नहरात पडल्याने जखमी झाल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले असून जलाशयात असलेला जलसाठा अल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती दिवसेंदिवस वाढते आहे.वनांच्या आगीवर नियंत्रण आवश्यकदरवर्षीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे जिल्ह्यात वणवा लागता असल्याने अत्यंत दुर्मिळ असणाºया वनस्पतींसह प्राण्यांना धोका पोहचत आहे. तरी देखील वनविभागाकडून गावोगावी जनजागृती केली जात नाही. ग्रामस्तरावर असणाऱ्या वनसमित्या या फक्त केवळ नावालाच आहेत. त्यांच्याकडूनही कोणतीही विचारपूस अथवा वनकर्मचाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला दिसून येत नाही. अनेक गावात तर गावासाठी असणारा वनरक्षक गावकऱ्यांना परिचीत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी जनजागृतीची गरज आहे.
पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:03 PM
जिल्ह्यात सर्वत्र उन्हाची दाहकता वाढली असून त्याचा सर्वात जास्त परिणाम वन्यप्राण्यांवर होत असून पाण्यासाठी वन्यप्राणी सैरभैर फिरत आहेत. जंगलातील पाणवठे चार महिन्यांपुर्वीच आटल्याने अनेक वन्यजीव पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्यातच अलीकडे बिबट्याने हल्ला केलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ठळक मुद्देनैसर्गिक पाणवठे आटले : वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज