शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कायद्यातील सुधारणेमुळे अवैध दारूविक्री बंद होणार का?

By admin | Published: August 19, 2016 12:38 AM

अवैध दारूविक्री करणाऱ्याला दहा वर्षाच्या दारूविक्रीवर चाप बसणार आहे. मात्र यासाठी पोलिसाची चौकशी महत्वपूर्ण ठरणार आहे.

साकोली : अवैध दारूविक्री करणाऱ्याला दहा वर्षाच्या दारूविक्रीवर चाप बसणार आहे. मात्र यासाठी पोलिसाची चौकशी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे खरोखरच पोलीस अवैध दारू विक्रीवर कार्यवाही करणार की त्यांना हप्तेखोलीमुळे बगल देणार, हा खरा प्रश्न आहे. तालुक्यात परवानाधारक दारू दुकाने मोजकीच असून अवैध दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातही काही गावे दारूबंदीची आहे, असे असताना काही वर्षापासून ना अवैध दारू विक्री बंदी झाली, ना दारूबंदी. पोलीस प्रशासनाला या अवैध दारू विक्रेते सैराट झाल्याचे चित्र आहे. कायद्याच्या चौकटीत कडक कारवाईचे निर्बंध नसल्यामुळे अवैध दारू विक्रीकडे वळल्याने झिंग झिंग झिंगाट परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी अवैध दारू विक्रेत्यांची जामिनावर सुटका होत होती. आता मात्र कायद्यात बदल करण्यात आली आहे. तालुक्यात ६४ ग्रामपंचायत अंतर्गत ९६ गावांचा समावेश आहे. यात हातावर मोजणारी ५ ते १० दुकान परवानाधारक सोडली तर अवैध दारू विक्रीचे अवैध दुकाने आहेत. अवैध दारू पुरवठ्यासह नवनवीन फंडे वापरून अवैध दारू पुरवठ्यासह दारू विक्री केली जाते. एकीकडे शासनस्तरावर दारूबंदी, तंटामुक्ती व्यसनमुक्ती गावे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना पुरस्कृत केले जाते. परंतु गावकऱ्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नावर अवैध दारू विक्रेत्यांकडून पाणी फेरल्या जाते. दुसरीकडे अवैध दारूविक्री प्रकरणात अडकला तरी कायद्याच्या चाकोरीतून लवकरच बाहेर निघण्याची सोय विक्रेत्यांना गवसल्याने या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली. मात्र आता अवैध दारू विक्री करणाऱ्यांची खैर नाही. अवैध दारू विक्री करणाऱ्यास पोलिसांनी रंगेहात पकडून गुन्हा दाखल केल्यास आणि त्यांच्या विरोधात सबळ पुरावे दिले तर त्या दोषीला न्यायव्यवस्था दहा वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. आता कायद्याच्या रखवालदारांनी त्या कायद्याची अंमलबजावणी इमानेइतवारे करवायाची आहे. यापूर्वी अनेकदा अवैध दारू विक्रेत्यांवर धाडी घालून पोलीस मुद्देमालासह आरोपींना अटक करत होती. अवैध दारू संदर्भात काही दंड भरून ती निर्दाेष सुटायचा आणि पुन्हा त्या अवैध दारूचा गोरखधंदा सुरू व्हायचा. (तालुका प्रतिनिधी)