भंडारा : राज्यात २३९ नगरपरिषदा ंअसून त्यामध्ये नव्याने १०० नगर पंचायती समाविष्ट झालेले आहेत. या नवनिर्मित नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ३० नोव्हेंबरला होत आहे. मात्र, या नगर पंचायतींच्या कार्यकक्षा अद्याप स्पष्ट ठरलेल्या नाहीत. मुख्यधिकाऱ्यांच्या नियुक्ती झालेली नसल्यामुळे या नवनिर्मित नगर पंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील २३९ नगर परिषदांच्या कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य आणि मुख्याधिकाऱ्यांचे अधिकार नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहेत. परंतु, नवनिर्मित १०० नगर पंचायतींची कार्यकक्षा, नगराध्यक्षांचे कर्तव्य याविषयी कुठलिही मार्गदर्शक तत्त्वे अद्यापही नगरविकास विभागाने स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे केवळ नगर परिषद आणि नगर पंचायतींना सारखे अधिकार आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी राज्य शासनाचे कुठलेही स्पष्ट आदेश नाहीत. त्यामुळे सर्व कारभार राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार सुरू राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नवीन नगरपंचायतींच्या कार्यकक्षा कधी ठरणार ?
By admin | Published: November 29, 2015 2:40 AM