लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या कक्षात लिपीक संवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा मंगळवारला पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांनी लिपीकसवंर्गीयांच्या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.संघटनेने एकंदरीत अकरा विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यात लिपीकवर्गीय संवर्गीयांचे पदोन्नती प्रकरण निकाली काढण्यात यावे, जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील लिपीक वर्गीयांचे प्रतिनियुक्ती रद्द करण्यात यावे, पंचायत समिती शिक्षण विभाग व हायस्कुलकरिता प्रवासभत्ता व किरकोळ खर्चाकरिता तरतुद उपलब्ध करण्यात यावे, पंचायत समिती स्तरावरील कर्मचाºयांचे कार्यासन १५ मे २०१४ च्या शासननिर्णयानुसार गटविकास अधिकारी यांनी कार्यवाही करावी, कर्मचाºयांचे कालबध्द प्रकरण मंजूरीची कार्यवाही करावी, विभागीय स्पर्धा परिक्षेसंबंधी कारवाई करुन वरिष्ठ सहायकाची पदे भरण्यात यावी, महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्ष मिळविण्यात यावे, सातव्यावेतन आयोगाच्या निश्चितीकरिता प्रशिक्षण वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकासंबंधाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आजाराच्या प्रमाणपत्राबाबत निर्णय घेण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव, खाते प्रमुखांमार्फत न पाठविता वित्त विभागात पाठविण्यात यावे, आदी मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.उपस्थित मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी लिपीकसवंर्ग हा प्रसासनाचा महत्वपूर्ण घटक असून प्रत्येकानी आपली जबाबदारी पार पाडावी, म्हणजे कुणीही कुठल्याही लाभापासून वंचित राहणार नाही, असे सांगितले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.शिष्टमंडळात संघटनेचे विभागीय अध्यक्ष केसरीलाल गायधने, कार्याध्यक्ष मनिष वाहाने, प्रभु मते, जिल्हा सचिव यशवंत दुनेदार, सुधाकर चोपकर, विजय सार्वे, रविंद्र राठोड, रवी भुरे, संजय मुडपल्लीवार, शिवशंकर रगडे, वनिता सार्वे, निता सेन, रेखा भवसागर, योगेश धांडे, सुनिल राखडे, शारदा लांजेवार, अमिता भोगे, अंजली घरडे, निशाने, तेलमासरे, मेश्राम, चौधरी, मोहुर्ले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:56 AM
लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या कक्षात लिपीक संवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा मंगळवारला पार पडली.
ठळक मुद्देसीईओंचे आश्वासन : लिपीक संवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा