नंदू परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील १२ वर्षापासून भंडाºयात येणाºया जिल्हाधिकाºयांचा कार्यकाळ कधीही पुर्णत्वास गेला नाही. कुणी वर्ष तर कुणी दीड वर्षेच भंडाºयात राहिलेले आहेत. सर्व सुरळीत असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या स्थांनातरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या हेवेदाव्यामुळे राजकीय बळी तर ठरले नाहीत ना? अशा प्रतिक्रिया आता जनसामान्यांमध्ये उमटत आहेत.प्रशासकीय बदलीचा कार्यकाळ साधारणत: अडीच ते तीन वर्षांचा असतो. परंतु मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात भंडाºयात १० जिल्हाधिकारी रूजू झाले आणि त्यांचे स्थांनातरण झाले. यात काही जिल्हाधिकारी वर्षभर राहिले, काही दोन वर्ष राहिले तर काहींना वर्ष संपण्यापूर्वीच भंडाºयातून परतावे लागले. मागील २००६ ते २०१८ या १२ वर्षांच्या कालावधीत तीन वर्षांचा कार्यकाळ गृहित धरले तर चार ते पाच अधिकारी रूजू झाले असते आणि कार्यकाळ संपवून परत गेले असते. परंतु भंडाºयात या १२ वर्षाच्या एका तपात १० जिल्हाधिकारी रूजू झाले आणि स्थांनातरण होऊन परत गेले. १५ दिवसांपूर्वी नागपूर महानगर पालिकेत रूजू झालेले उपायुक्त शंतनू गोयल हे आता नवे जिल्हाधिकारी म्हणून भंडाºयात रूजू होणार आहेत.२००६ मध्ये आघाडी शासनाच्या कार्यकाळात इंद्रमालो जैन रूजू झाल्यानंतर त्या केवळ १० महिने राहिले. त्यानंतर संभाजीराव सरकुंडे २३ महिने, अंशु सिन्हा ११ महिने, प्रदीप काळभोर २२ महिने, सच्चिंद्र प्रताप सिंह १२ महिने, माधवी खोडे २१ महिने, धीरजकुमार ११ महिने, अभिजीत चौधरी आठ महिने, सुहास दिवसे १४ महिने राहिले असले तरी अलिकडे महिनाभर ते सुटीवर असल्यामुळे त्यांचा कार्यकाळ १३ महिने असा राहिला. भंडाºयात रूजू होण्यापूर्वी धीरजकुमार नांदेड येथे जिल्हाधिकारी होते. येथे त्यांनी कामाचा आवाका वाढविला असतानाच त्यांचे स्थांनातरण झाले. वारंवार होणाºया बदलीच्या तगाद्यामुळे त्यांनी राज्य बदलून उत्तरप्रदेशात स्वराज्यात पदस्थापना करून घेतली.जैन, सरकुंडे, सिन्हा, काळभोर, खोडे, सच्चिंद्र सिंह, धीरजकुमार, चौधरी रूजू झाले आणि गेले त्याचे कुणालाही वाईट वाटले नाही. परंतु शेतकरी, जनसामान्यांच्या समस्या एैकून घेऊन त्यांच्यासाठी काम करणारे सुहास दिवसे यांचे स्थानांतरण झाल्यामुळे प्रशासनातही असंतोष पसरला आहे. कार्यकाळ संपण्यापूर्वीच वारंवार होणाºया बदल्यांचा ठपका लोकप्रतिनिधींवर आता बसत आहे.सीईओंच्या बदलीमुळे जिल्हा परिषदेमध्ये असंतोषजिल्हा परिषदेत आजवर आलेल्या बहुतांश मुख्य कार्यकारी अधिकाºयांविरूद्ध जिल्हा परिषद सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. यापूर्वी माधवी खोडे, त्यानंतर राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अविश्वास आणण्यात आला. त्यानंतर आलेल्या शरद अहिरे यांचा कार्यकाळ बराच वादग्रस्त ठरला. परंतु त्यानंतर रूजू झालेले मनोजकुमार सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद प्रशासनावर पकड आणली. ओडीएफ मुक्त जिल्हा केला. याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘सक्षम’ हा उपक्रम राबविला. असे लोकहितपयोगी कार्य करणाºया अधिकाºयांचे स्थांनातरण केल्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसह अधिकारी व कर्मचाºयांमध्ये कमालिची नाराजी पसरली आहे.
वर्षभरातच बदलतात भंडाऱ्यात जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:39 PM
मागील १२ वर्षापासून भंडाºयात येणाºया जिल्हाधिकाºयांचा कार्यकाळ कधीही पुर्णत्वास गेला नाही. कुणी वर्ष तर कुणी दीड वर्षेच भंडाºयात राहिलेले आहेत. सर्व सुरळीत असताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या स्थांनातरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे अधिकारी लोकप्रतिनिधींच्या हेवेदाव्यामुळे राजकीय बळी तर ठरले नाहीत ना? अशा प्रतिक्रिया आता जनसामान्यांमध्ये उमटत आहेत.
ठळक मुद्देएकाच दिवशी दोन्ही अधिकारी बदलले : अधिकाऱ्यांच्या वारंवार स्थांनातरणाचा लोकप्रतिनिधींवर ठपका