शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

रांगोळीशिवाय दिवाळी सण अपूर्ण

By admin | Published: October 30, 2016 12:35 AM

रांगोळी मांगल्याचं प्रतीक. प्रत्येक सुखद आणि घराच्या अंगणात रांगोळीचे वास्तव्य लक्षवेधक असते.

आज लक्ष्मी पूजन : दिव्यांच्या प्रकाशाइतकाच आनंद-ऊर्जेचा स्रोतरविंद्र चन्नेकर बारव्हा रांगोळी मांगल्याचं प्रतीक. प्रत्येक सुखद आणि घराच्या अंगणात रांगोळीचे वास्तव्य लक्षवेधक असते. दिवाळीच्या सणाला तर घरी येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिव्याची आरास विविध रंगानी नटलेली अंगणातील मनमोहक रांगोळी दिव्यांच्या उर्जेइतकेच आनंदाच स्त्रोत बहाल करीत असते.घराच्या अंगणातील रांगोळी ही घराचा आरसा समजल्या जाते. मनमोहक, आकर्षक रांगोळी काढण्यासाठी आपले कसब पणाला लावतात. बाजारातील विविध रंगांनी सजलेली रांगोळीची दुकाने पाहून मन मोहरुन जाते. दिवाळीच्या आठवडाभर आधीपासूनच रांगोळी खरेदीसाठी महिलांची या दुकानावर झुंबड दिसून येते. लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी, निळा, जांभळा, मोरपंखी, काळा आणि महत्वाचा रंग पांढरा अशा विविध २० ते २५ रंगाच्या रांगोळीचा विक्रमी खप होत असतो.मागील काही वर्षापासून रांगोळीतही अनेक प्रकार आले आहेत. स्टिकरच्या रांगोळीचे फॅडही निघाले आहे. यात रंगाचा वापर न करता हे रांगोळीचे स्टिकर घरांच्या अंगणात, घरासमोर चिटकविल्या जाते. राजस्थान, गुजरात या भागातून मिळणाऱ्या पांढऱ्या चिनीमातीपासून बनविलेली रांगोळी बाजारात विक्रीस आणली जाते. पाहिजे तो रंग टाकून ही पांढरी माती रॉकेल मिश्रीत केल्यावर रांगोळीची निर्मिती होते.रांगोळीचा व्यवसाय हा हंगामी असून या व्यवसायात आता अनेक बेरोजगार उतरले आहेत. पांढऱ्या रांगोळीशिवाय इतर रंगाच्या रांगोळीला फारशी मोजणी नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होतो, असे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.रांगोळी ही किलोने, मापाने सुद्धा विकली जाते. हे माप पाच रुपयापासून दहा रुपयापर्यंत असते. गेल्या काही वर्षापासून सणासुदीला अंगणात संस्कार भारतीची रांगोळी काढल्याचे फॅड वाढले आहे.बदलत्या जीवनशैलीनुसार आणि महिला व युवतीच्या पसंतीनुसार रांगोळीच्या डिझाईनमध्ये नेहमीच नाविण्य पाहावयास मिळते. तांदळाची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, चटईची रांगोळी असे अनेक प्रकारची दिवाळीमध्ये वापरल्या जातात. भारतीय संस्कृतीत सणवार आणि रांगोळी हे मांगल्याचे प्रतिक समजले जात असून आनंदाच्या क्षणाला रांगोळीची किनार असतेच.