लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या आधार कार्डापासून जिल्ह्यातील तीन हजारांवर शालेय विद्यार्थी अद्यापही वंचित आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनात आल्याने त्यांच्यासाठी पुढील महिन्यात विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले.युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने (युआयडीएआय) देशातील सर्व नागरिकांना विशिष्ट ओळखक्रमांक दिला जात आहे. त्यालाच आधार असे म्हटले जाते. या आधार कार्डापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविली जाते.शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याची मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली होती. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात सुमारे २८४५ विद्यार्थी आधारकार्डापासून वंचित आहेत. ५ ते १५ वयोगटातील हे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करुन देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.संपूर्ण राज्यात ही मोहिम राबविली जात असून भंडारा जिल्ह्यातही याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.भंडारा येथे झालेल्या प्रशिक्षणात सात तालुक्याचे ४२ व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. तसेच या मोहिमेसाठी जिल्हास्तरावर दोन समन्वयकांची निवड करण्यात आली. कार्यक्रम अधिकारी प्रकाश काळे व सांख्यकी सहायक भारती भोंगाडे यांचा समावेश आहे. तसेच तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, काहींचे आधारकार्ड अपडेट करण्याचे काम या मोहिमेतून केले जाणार आहे.
तीन हजार विद्यार्थी आधारविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:17 PM
विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या आधार कार्डापासून जिल्ह्यातील तीन हजारांवर शालेय विद्यार्थी अद्यापही वंचित आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनात आल्याने त्यांच्यासाठी पुढील महिन्यात विशेष मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले.
ठळक मुद्देमोहीम राबविणार : ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थी, शिक्षण विभागाचा पुढाकार