शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मृतकाची नोंदविली साक्ष !

By admin | Published: June 28, 2016 12:36 AM

वारसान हक्काप्रमाणे वडिलोपार्जित जमीनीवर नाव चढविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या मुलाचे नाव वगळण्यासाठी मृत पावलेल्या आईला गैरअर्जदार बनवून त्यांची साक्ष घेण्यात आली.

आरोप : तहसीलदार, तलाठी, मंडळ निरीक्षकांच्या कार्यवाहीवर संशयभंडारा : वारसान हक्काप्रमाणे वडिलोपार्जित जमीनीवर नाव चढविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या मुलाचे नाव वगळण्यासाठी मृत पावलेल्या आईला गैरअर्जदार बनवून त्यांची साक्ष घेण्यात आली. एवढेच नव्हे तर चक्क फेरफारही करण्यात आल्याचा प्रताप भंडारा तहसील कार्यालयात उघडकिला आला आहे. तहसीलदार, तत्कालीन तलाठी, तत्कालीन मंडळ निरिक्षक यांच्यावर कारवाईचा आरोप महेशकुमार चिर्वतकर (रा. राजनांदगाव) यांनी केला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी चिर्वतकर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, महेशकुमार चिर्वतकर यांचे वडील स्व.गोविंदराव चिर्वतकर यांची वडिलोपार्जित जमीन कारधा तथा गिरोला येथे आहे. गोविंदरावांचा १९ जानेवारी १९९१ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मोठा मुलगा महेशकुमार चिर्वतकर यांचे नाव वारसानाप्रमाणे चढविण्यात आले नाही. यासंदर्भात १७ मार्च १९९३ मध्ये गोविंदराव यांची पत्नी सुंदरबाई चिर्वतकर, मुलगा कृष्णराव, राजेशकुमार व आभा चिर्वतकर यांची नावे चढविण्यात आली. यादरम्यान मोठा मुलगा महेशकुमार यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आपल्यापरीने कार्यवाही केली. परिणामी वारस म्हणून महेशकुमार यांचे नाव फेरफार क्रमांक ११६ वर नोंदविण्यात आले. याचवेळी त्यांचे भाऊ राजेशकुमारने आक्षेप घेतल्यामुळे राजस्व निरिक्षक मंडळाने वादग्रस्त प्रकरण तहसीलादारांकडे निर्णयार्थ पाठवावे, असा शेरा दिला. या कालावधीत तलाठी कार्यालयातून १९९३ ची वादग्रस्त नोंद गायब झाली आहे. यानंतर महेशकुमार मुळ दस्तऐवज यांनी मागितल्यावही त्यांना देण्यात आले नाही. १४ एप्रिल २००७ ला सुंदरबाई चिर्वतकर यांचा मृत्यू झाला. मात्र मृत पावलेल्या सुंदरबाई यांची साक्ष सदर प्रकरणात नोंदवून १९९३ ला झालेल्या फेरफारची नोंद रद्द (निरस्त) करण्यात आली. या आशयाचा आदेश तहसीलदारांनी २८ मे २०१४ दिल्याचा आरोपही महेशकुमार चिर्वतकर यांनी केला. संपत्तीवरील माझा अधिकार डावलून स्व:तच्या फायद्यासाठी केलेल्या कारवाईची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करण्यात आल्याची माहिती आहे. वृत्ताच्या माध्यमातून न्यायालयीन प्रक्रियेवर ताशेरे ओढणे हा आमचा हेतू नाही. पंरतु गोविंदराव चिर्वतकर यांच्या मृत्युनंतर जमीनीच्या वारसानमध्ये सर्वात प्रथम अधिकृतपणे सुंदरबाई यांचे नाव चढले, तर २८ मे २०१४ ला तहसीलदारांच्या आदेशापर्यंत सुंदरबाई यांचा मृत्यू झाला आहे, ही बाब का लपविण्यात आली, हा महत्वाचा मुद्दा आहे. वेळोवेळी मुलांची साक्ष नोंदविण्यात येते, मात्र पतीच्या मृत्युनंतर मुख्य वारसान म्हणून नाव असलेल्या सुंदरबाई चिर्वतकर यांची साक्ष व उपस्थितीबाबत महसुल प्रशासनाने का विचारणा केली नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. (प्रतिनिधी)चिर्वतकर यांच्या प्रकरणात आमच्याकडे उपलब्ध दस्तऐवजात सुंदरबाई यांची साक्ष असल्याची नोंद नाही. त्या हयात आहे की नाही, याची नोंद उपलब्ध करून दिलेली नाही. प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करण्यात आले आहे. - सुशांत बनसोडे,तहसीलदार भंडारा