शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

उपचाराअभावी महिलेचा मृत्यू

By admin | Published: May 12, 2016 12:41 AM

उच्च रक्तदाब वाढून श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे एक महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता गेली.

नाकाडोंगरीतील प्रकार : आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीमोहन भोयर तुमसरउच्च रक्तदाब वाढून श्वसनाचा त्रास जाणवल्यामुळे एक महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता गेली. उपचार करणारे डॉक्टर उपस्थित नव्हते तथा इन्व्हर्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने तिच्यावर उपचार झाले नाही. परिणामी महिला परत जाताना तिचा मृत्यू झाला.मृतक महिलेचे नाव कल्पना भीमराव नांदगावे (४७) रा.पाथरी असे आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले तथा सामाजिक कार्यकर्ता ठाकचंद मुंगुसमारे यांनी केली आहे.कल्पना नांदगावे व त्यांच्या मुलगा ग्रा.पं. सदस्य गौरव नांदगावे (३०) नाकाडोंगरी येथील आठवडी बाजाराकरिता आले होते. कल्पनाला श्वसनाचा त्रास वाढून उच्च रक्तदाब वाढल्याचे जाणवले. त्यामुळे गौरव यांनी आईस प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचाराकरिता घेऊन गेले. तेव्हा आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. उपस्थित परिचारिका बांगर यांनी तपासणी केली. तेव्हा आॅक्सीजनची गरज आहे असे सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज गेली होती. इन्व्हर्टर नादुरुस्त असल्याने आॅक्सिजन देता येणार नाही. त्यामुळे परिचारिका बांगर यांनी तुमसर येथे रेफर केले.रस्त्यात कल्पनाची प्रकृती जास्तच खालावली व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती आष्टीचे पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.ए. कुरैशी यांना देण्यात आली. काही वेळानंतर ते एका अन्य डॉक्टरांसोबत प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे आले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील इन्व्हर्टर नादुरुस्त आहे. तो दुरुस्त केला असता तर महिलेचा मृत्यू झाला नसता. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन पदे आहेत. त्यापैकी एक पद रिक्त आहे. दुसरे वैद्यकीय अधिकारी सुटीवर आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरे वैद्यकीय अधिकारी येथे ओपीडी करून निघून जातात. घटनेच्या दिवशी येथे परिचारिकेने तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. आपातकालीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची येथे गरज होती.या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुपनलिका बंद आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव असल्याने अनेकदा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप करून तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले यांनी केली आहे.पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथे नियुक्ती केली असून घटनेच्या दिवशी सदर डॉक्टर स्थानिक बाजारात गेले होते. येरली येथील डॉक्टरांकडे प्रभार देण्यात आला आहे. इन्व्हर्टरचा बॅकअप मिळाला नाही. मृत महिलेची प्रकृती चिंताजनक होती.- डॉ. एम.ए. कुरैशीतालुका वैद्यकीय अधिकारी, तुमसर.