लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत दीड ते दोन महिन्यांपासून बांधकाम कामगारांकरिता कीटचे वाटप सुरु आहे. सोमवारी तुमसरातील एका केंद्रावर शेकडो महिला आपल्या चिमुकल्यासह रांगेत उभ्या असूनही दीड महिन्यापासून संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे महिला कामगारांची फरफट होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कामगार कीट वाटप कामगारांच्या हिताचे नसून डोकेदुखी ठरत आहे.तुमसर बाजार समितीच्या आवारात कीट वाटप करण्यात येत असून कीटकरिता दररोज शेकडो महिला पुरुषांच्या रांगा लागतात. दिवसभर रांगेत उभे राहून कामगारांना कीट मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रांगा लागूनही कर्मचारी उशिरा पोहचल्याने महिला कामगार आपल्या लहान चिमुकल्यांसह ताटकळत बसले होते. शेकडो महिला पुरुष दररोज रांगा लावत असताना प्रशासनाकडून मात्र याबद्दल कोणतेच नियोजन होत नसल्याने या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.याबाबत महिला कामगार म्हणाले, दररोज वेगवेगळे नवनवीन कारणे सांगितले जात आहेत. यामध्ये अनेक शेतमजूर, बांधकाम कामगार, अनेक महिला आपल्या लहान मुलांसह रांगेत उभे राहतात. येथे अनेकदा पिण्याच्या पाण्याची तसेच मुलांच्या जेवणाची समस्या असतानाही रांग सोडून जाता येत नाही. कधीकधी पहाटे घराबाहेर पडावे लागत असल्याचेही प्रतिक्रिया दिली. कीट मिळविण्याकरिता महिलांना विशेष करून तासन्तास ताटकळत ठेवले जाते. गत दीड ते दोन महिन्यांपासून बांधकाम कामगारांना कीट वाटप करण्यात येत आहे. परंतु सर्वच ठिकाणी कामगारांची गर्दी दिसत असल्याने तासन्तास रांगेत उभे राहणे ही नित्याचीच गोष्ट झाली आहे. संबंधित विभागाचे कर्मचारीही हतबल झाल्याने उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शासनाच्या रिक्त पदाचा व नियोजनशून्य कारभारामुळे लाभार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. यासाठी अनेक लोकप्रतिनिधींकडे गाऱ्हाणे मांडले असता त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. संतप्त झालेल्या बांधकाम कामगार निशीकांत पेठे यांनी लाखो रुपये पगार घेणाºया अधिकाऱ्यांना बांधकाम कामगारांना होणाºया त्रासाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची संतप्त प्रतिक्रिया देऊन याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.
कामगार कीटसाठी महिला कामगारांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:12 AM
तुमसर बाजार समितीच्या आवारात कीट वाटप करण्यात येत असून कीटकरिता दररोज शेकडो महिला पुरुषांच्या रांगा लागतात. दिवसभर रांगेत उभे राहून कामगारांना कीट मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रांगा लागूनही कर्मचारी उशिरा पोहचल्याने महिला कामगार आपल्या लहान चिमुकल्यांसह ताटकळत बसले होते.
ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : चिमुकल्यांचा जीव धोक्यात, पहाटेपासून रांगाच रांगा, नियोजनाचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष