शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; आंधळगाव पोलीस स्टेशन येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2023 5:59 PM

चव्हाण यांना काल ३० एप्रिलला रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आंधळगाव येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराचा धक्का आला होता.

आंधळगाव(जि. भंडारा): भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये २००८ पासून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (रा. आंधळगाव) असे मृत पावलेल्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

चव्हाण यांना काल ३० एप्रिलला रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आंधळगाव येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारार्थ भंडारा येथे हलवीत असताना मृत्यू झाला. ३० एप्रिलला आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री साडेदहाला जेवण करत असताना तिला हृदयविकाराच्या झटका आला. 

उपस्थित पोलीस कर्मचारी व ठाणेदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे तिला ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तिला भंडाऱ्याला नेत असतानाच वाटेतच तिच्यावर काळाने झडप घेतली. प्रज्ञा चव्हाण ह्या आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. त्यांची सासुरवाडी आंधळगाव येथीलच आहे तर माहेर भंडारा जवळील खोकरला येथील असल्याचे समजले. 

त्या गेल्या पंधरा वर्षापासून भंडारा पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, पती असा परिवार आहे. आज आंधळगाव येथील स्मशानभूमीत  त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, पोलीस निरीक्षक तथा आंधळगाव पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी गावकरी उपस्थित होते..

टॅग्स :Policeपोलिस