जांब येथील प्रकार : सभेत झाली घोषणारमेश लेदे जांब (लोहारा) मोहाडी तालुक्यात येत असलेल्या जांब येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती पुर्नगठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्ह्यात पहिल्यांदाच वसुंधरा किरण अतकरी यांची अविरोध निवड झाल्याने महिला वर्गामध्ये कौतुक होत आहे.जांब ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारला तंटामुक्त समिती पुर्नगठीत करण्याकरिता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. एकनाथ लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी संपतराव गभणे, किरण अतकरी, शेखर उताणे, दिलीप ढोसरे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. कावळे, उपसरपंच सुधाकर मेश्राम, सुहास सुखदेवे, दिवाकर उके, पंचायत समिती सदस्य जगदिश उके, जगदिश कोरडे, नलिनी कोरडे यांच्यासह १७२ ग्रामस्थ ग्रामसभेत उपस्थित होते. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकरिता दोन गटातुन प्रत्येकी एक या प्रमाणात पुरुषांचे नावे सुचविण्यात आले. त्यावर हात वर करुन मतदान करण्याचे चर्चा झाली. पण यावेळी वाद निर्माण झाला व लगेच ग्रामसभेमधून महिला अध्यक्ष घेण्याचे चर्चा झाली. तर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाकरिता वसुंधरा किरण अतकरी यांचे नाव नलिनी जगदिश कोरडे यांनी सुचविले तर अनुबोधन सरपंच दिपा उके यांनी केले. यावर थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर अध्यक्षपदाकरिता वसुंधरा किरण अतकरी यांची ग्रामसभेत अविरोध निवड झाल्याची सभाध्यक्ष एकानाथ लांजेवार यांनी जाहिर केले. वसुंधरा अतकरी या जि.प.चे माजी सदस्य किरण अतकरी यांची पत्नी आहे. या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सदस्य, दिवाकर उके, क्रिष्णा बालपांडे, सुभाष मेश्राम व ग्रामस्थ उपस्थित होते.
तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी महिलेची वर्णी
By admin | Published: April 01, 2016 1:13 AM