भंडारा : दाेन माेटारसायकलमध्ये लागलेल्या रेसिंगच्या नादात एका महिलेचा बळी गेला, तर दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना भंडारा शहरातील खातराेडवर रविवारी रात्री घडली. धडक एवढी भीषण हाेती की, महिला १५ फूट फेकली गेली. याप्रकरणी भंडारा शहर ठाण्यात नाेंद घेण्यात आली आहे.
ललिता रामकृष्ण टांगले (६०, रा. लक्ष्मीनगर, खातराेड, भंडारा) असे मृत महिलेचे नाव आहे, तर वत्सला जिभकाटे आणि नलिनी टिचकुले अशी जखमी महिलांची नावे आहेत. रविवारी रात्री त्या खातराेडवर शतपावली करीत हाेत्या. रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकावर उभ्या हाेत्या. दरम्यान, भंडाराहून खुर्शिपार दिशेने दाेन माेटारसायकल भरधाव वेगाने जात हाेत्या. त्यावेळी माेटारसायकल चालकाचे नियंत्रण गेले आणि थेट या महिलांना धडक दिली. धडक एवढी जबर हाेती. तिन्ही महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या. परिसरातील नागरिकांनी या तिघींनाही तत्काळ भंडारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ललिताचा मृत्यू झाला. या अपघातात माेटारसायकलवरील दाेन तरुणही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेतील माेटारसायकलस्वार मुले अल्पवयीन असून, याप्रकरणाची नाेंद भंडारा ठाण्यात करण्यात आली आहे.
रहिवाशांचे पाेलीस अधीक्षकांना निवेदन
अपघाताच्या या घटनेनंतर खातराेडवरील रहिवाशांमधून संताप व्यक्त हाेत आहे. येथील रहिवाशांनी साेमवारी जिल्हा पाेलीस अधीक्षक लाेहीत मतानी यांची भेट घेऊन निवेदन दिले. खातराेडवरील अपघात राेखण्यासाठी बंदाेबस्त लावावा, वैशालीनगर ते टवेपारपर्यंत सर्व चाैकात गतिराेधक लावण्यात यावे, फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच एक निवदेन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनाही देण्यात आले.
दुचाकीच्या धडकेत दाेन बालकांसह तीन जण गंभीर
भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दाेन बालकांसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कुंदन विजय वासनिक (३५), वेतन कुंदन वासनिक (११) आणि सुरेश अंकुश ईटनकर (११) सर्व रा. रुयाड, ता. पवनी अशी जखमींची नावे आहेत. कुंदन आपला मुलगा वेतन व सुरेश या शेजारी मुलासाेबत पंचभाई राईसमिलकडे फिरायला गेले हाेते. पायी घराकडे परत येत असताना भरधाव दुचाकीने (एमएच३६ डब्ल्यू ८१११) धडक दिली. या धडकेत तिघेही खाली काेसळून गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी जखमीला उपचारांसाठी पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी प्रमाेद राजू वासनिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीचालक अर्जुन माेहरकर रा. ब्राह्मणी, ता. पवनी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास राऊत करीत आहेत.