जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर, नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. याकरिता जिल्ह्यात १०९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
कोरोनाची साथ थोपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीतजास्त नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. आता मात्र, पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी उपकेंद्र स्तरावर लसीकरणाची सोय केली आहे.
बॉक्स
मी लस नाही घेतली, कारण कोरोना लस घेतल्यास ताप येत असल्याचे अनेक जण सांगतात. त्यामुळे लसीविषयी भीती वाटत असल्याने आपण लस घेतली नाही. आमच्या गावात लसीकरण शिबिरात फार कमी नागरिकांनी लस घेतली.
- नंदा सोनकुसरे, नागरिक