लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान भंडारा तालुक्यातील चिखली येथे मागील दोन वर्षापासून सेंद्रीय शेती प्रकल्प तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांचे मार्गदर्शनात सुरु आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक व्यवसाय चालू करता यावे यासाठी जिल्हा कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांचे मार्गदर्शनातून चिखलीच्या आदर्श शेतकरी बचत गटाची आंतरराज्यीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यांना रामटेक तालुक्यातील गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार रामटेक येथे १७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर अशा पाच दिवसीय प्रशिक्षणासाठी आत्मातर्फे पाठवण्यात आले.आदर्श गटाचे अध्यक्ष तानाजी गायधने यांच्यासह राधा गंगारे,माला वाघमारे,मनिषा गायधने,नानीबाई कुंभळकर,निर्मला गंगारे व अन्य १५ महिला शेतकरी महिला शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडे निसर्गत: उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून दशपर्णी अर्क, गांढूळ खतनिर्मीती, निमास्त्र, अग्नीस्त्र तसेच शेतीआधारित लघुउद्योगावर पाच दिवसांची कार्यशाळा देवलापार येथे विविध विषयांवर आधारित आयोजित करण्यात आली होती.प्रशिक्षणामध्ये शेतकºयांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन शेतीचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळाले. महिलांना सेंद्रीय शेती म्हणजे काय, सेंद्रीय शेती कशी करता येईल, ग्राहकांना विषमुक्त अन्न कसे पुरविता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्र्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश विषमुक्त शेती असल्याने गोअनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र आणि शेणापासून धूपबत्ती, अगरबत्ती, गोनाईल, साबण, गोवऱ्या, दंतमंजन, शांपू असे अनेक नैसर्गिक उत्पादने बनविण्यापासून त्यांच्या विक्री कौशल्याचे सविस्तर पाच दिवसांचे सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
सेंद्रीय शेतीसाठी महिला शेतकरी सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:04 AM
आदर्श गटाचे अध्यक्ष तानाजी गायधने यांच्यासह राधा गंगारे,माला वाघमारे,मनिषा गायधने,नानीबाई कुंभळकर,निर्मला गंगारे व अन्य १५ महिला शेतकरी महिला शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांकडे निसर्गत: उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून दशपर्णी अर्क, गांढूळ खतनिर्मीती, निमास्त्र, अग्नीस्त्र तसेच शेतीआधारित लघुउद्योगावर पाच दिवसांची कार्यशाळा देवलापार येथे विविध विषयांवर आधारित आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्देशाश्वत शेती अभियान। कृषी तंत्रज्ञान यंत्रणा आत्माचा पुढाकार