उमरी येथील घटना : जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायत कार्यालयात बसून शासकीय काम करीत असलेल्या महिला सरपंचाचा विनयभंग करण्यात आला. ही घटना भंडारा तालुक्यातील उमरी (फुलमोगरा) येथे घडली. निशात मारोती रामटेके (२८) असे आरोपीचे नाव आहे. गुरूवारला ही घटना घडली आहे. पीडित महिला सरपंच ही सकाळी ११ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत होत्या. यावेळी आरोपी निशांत हा ग्रामपंचायतमध्ये आला त्याने तिथे गोंधळ घातला. त्याला ग्रामपंचायत सरपंच तथा उपस्थितांनी मज्जाव केला. दरम्यान निशांतने पीडित महिला सरपंच यांची ओढणी ओढून मारहाण करीत विनयभंग केला. त्यामुळे उपस्थितांनी सरपंचांना निशांतच्या तावडीतून कसेबसे सोडविले.याप्रकरणी महिला सरपंचाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी निशांतविरूद्ध भादंवि ३५४ (ब), ३२३, १६८ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आडे करीत आहे.
महिला सरपंचाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:24 AM